solapur 
पश्चिम महाराष्ट्र

मोदींनी सोडली शिर्डीत स्पेशल पुडी : सुशीलकुमार शिंदे

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : बनवेगिरीत अग्रेसर असलेल्या भाजप सरकारचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत स्पेशल पुडी सोडत, सोलापुरी जॅकेटचे उदाहरण दिले. चुकीची माहिती देऊन मोदी सरकारकडून सातत्याने बनवेगिरी केली जात आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने आयोजिलेल्या दोन दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. निरीक्षक सोनम पटेल, आमदार प्रणिती शिंदे, रामहरी रूपनवर, भारत भालके व सिद्धाराम म्हेत्रे उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, मोदी आल्यावर देशाचा विकास होईल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात ते झाले नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर तीन वर्षे थांबा असे मी म्हटले होते. तीन वर्षानंतर या सरकारचे खरे स्वरूप दिसून आले आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या वेळीही अशाच पद्धतीने पेट्रोलपंपांवर प्रसिद्धी केली जात होती. आताही त्याच पद्धतीचे फोटो लावले जात आहेत, मात्र पेट्रोल घ्यायला येणारे लोकच आता त्या पोस्टरला काळे फासत आहेत. आज त्यांच्या डोक्यात सत्ता घुसली आहे, त्यामुळे देशात हुकुमशाही असावी असे त्यांना वाटत आहे.

शिर्डीत बोलताना मोदी म्हणाले की मी घातलेले जॅकेट सोलापुरात तयार झाले आहे. देशाचे गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांनी या जॅकेटचा वापर मिलिट्रीसाठी का केला नाही. त्याचवेळी या कपड्याचा वापर निश्चित केला जाईल, असे सांगितले. मात्र आजपर्यंत एकाही पैशाची आॅर्डर मिळालेली नाही. अशा पद्धतीनेच बनवेगिरी करण्यात मोदी सरकार आघाडीवर आहे, असेही शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT