पश्चिम महाराष्ट्र

तरुणीचा खून करून पसार झालेला संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा

सांगली - टूरिस्ट लॉजमध्ये वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय २०, पंचशीलनगर) या तरुणीचा खून करून पसार झालेला संशयित अविनाश लक्ष्मण हात्तेकर (वय २५, रा. जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर) याला एलसीबीच्या पथकाने कोल्हापूर रेल्वे स्थानकावर अटक केली. हात्तेकर याने खुनाची कबुली दिली आहे. प्राथमिक तपासात वृषालीचा लग्नासाठीचा तगादा आणि वादातून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक माहिती अशी, की संशयित हात्तेकर आणि वृषाली हे दोघेजण पंचशीलनगर परिसरात राहत असल्यामुळे त्यांची ओळख होती. दोघांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. हात्तेकरचे लग्न झाले आहे. वृषालीला तो वारंवार पैसे देत होता. पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होत असे. तसेच वृषालीच्या मित्रामुळे वादात भर पडत होती. वृषाली सध्या कोल्हापूर रस्त्यावरील रामनगरला राहत होती. बुधवारी ती मैत्रिणीकडे जाते, असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती घराकडे परतली नाही. तिने बसस्थानकाजवळील टूरिस्ट लॉजमध्ये जाऊन रूम नं. १०७ बुक केली. रात्रीच्या सुमारास तिने हात्तेकरला बोलावून घेतले. हात्तेकर तिथे आल्यानंतर लॉजच्या जिन्यामध्येच त्यांच्यात वाद सुरू झाला. वृषालीने त्याला मारहाण केली. त्याने समजूत काढत तिला रूममध्ये नेले. 

दरम्यान, रात्री उशिरा वृषाली आणि त्याच्यात वाद झाल्यानंतर हात्तेकरने रुमालाने गळा आवळून खून केला. त्यानंतर तो लॉजमधून पळून गेला. ‘एलसीबी’चे कर्मचारी अमित परीट यांना लॉजवर खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. लॉजचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोघांची वादावादी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, बिरोबा नरळे, नीलेश कदम, सागर लवटे, संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप नलवडे यांच्या पथकाने अटकेची कामगिरी बजावली.

हात्तेकरवर यापूर्वीही गुन्हे 
खुनानंतर पळालेला हात्तेकर हा कोल्हापूर रेल्वेस्थानकावर असल्याची माहिती एलसीबीचे कर्मचारी बिरोबा नरळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने हात्तेकरला ताब्यात घेऊन शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. वृषालीने लग्नासाठी तगादा लावला होता, तसेच वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. 
हात्तेकर याच्याविरूद्ध यापूर्वी विश्रामबाग, संजयनगर पोलिस ठाण्यात मारामारी आणि मुलींची छेडछाड काढणे, असे गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT