Suvarnasoudh Esakal
पश्चिम महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीचे पडसाद; मुख्यमंत्री बदलाची चर्चा

विधान परिषद निवडणुकीचे पडसाद; स्थान धोक्यात आल्याचे संकेत

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election Result ) निकाल व मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुवर्णसौधमध्ये (Suvarnasoudh)बुधवारी (ता. १५) दिवसभर रंगली. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला (BJP) अपेक्षित यश मिळाले नाही. विधान परिषद निवडणुकीतही बेळगाव (Belgaum)जिल्ह्यात अनपेक्षित निकाल लागला. यामुळे मुख्यमंत्र्यांचे स्थान धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार महांतेश कवठगीमठ (Mahantesh Kavathgimath) यांचा पराभव झाला. कॉंग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी (Channaraj Hattiholi) आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी (Lakhan Jarkiholi)यांनी बाजी मारली. भाजपसाठी हा निकाल धक्कादायक ठरला आहे. त्याचे खापर माजी मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi)यांच्यावर फोडण्यात येत आहे. त्यासोबत राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनाही लक्ष्य करण्याची तयारी सुरु झाल्याचे दिसते. त्यातून मुख्यमंत्र्यांना बदलण्याबाबतची चर्चा विधानसौध परिसरात आमदारांच्या पातळीवर दिसली.

गेल्या महिन्यात मंत्री के. एस. ईश्‍वराप्पा (K.S.Ishwarappa) बेळगावात आले होते. त्यांनीही याचे संकेत दिले आहेत. त्याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय उपचारासाठी पुढील महिन्यांत विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. या काळात राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळू शकेल, असे मानले जात आहे. यामुळे बी. एस. येडियुराप्पा (B.S.Yeddyurappa) यांच्याप्रमाणे बसवराज बोम्मई यांना पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्याजागी नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.

हट्टीहोळींचा कॉंग्रेसतर्फे सत्कार

नवनिर्वाचीत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, सलीम अहमद, श्रीनिवास माने यांचा कॉंग्रेस पक्षातर्फे बुधवारी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, केपीसीसी अध्यक्ष शिवकुमार, एस. आर. पाटील, जी. परमेश्‍वर, रमेशकुमार, एच. के. पाटीलसह आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात उष्णतेचा इशारा 16 ते 18 एप्रिलदरम्यान येलो अलर्ट

Viral video Nagpur: नागपूरात वाहतूक कोंडीचा गर्भवती मातेला फटका; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान घटना, मोठी वाहतूक कोंडी, व्हिडीओ व्हायरल..

IPL 2026 सलग दोन विजयानंतर CSK चे टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच झाला बाहेर

SCROLL FOR NEXT