Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत स्वाभिमानीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

सांगली : खासदार संजय पाटील यांनी तासगाव, नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता. १७) विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चा काढला. बिले न देणाऱ्या साखर कारखानदारांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या कारखानदारांचे करायचे काय... खाली मुंडके वर पाय...खासदार संजयकाका हाय...हाय... अशा घोषणा आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्या.

सांगली येथील विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा आडवण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी तासगाव, नागेवाडी कारखान्याची बिले थकल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आम्ही आत्ता अर्धनग्‍न अवस्थेत मोर्चा काढला आहे. यापुढे पूर्णनग्न काढू असा इशारा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा दोघांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

तासगाव, नागेवाडी कारखान्याला ऊस गाळप घातलेले सुमारे २०० हून अधिक शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. खासदार संजय पाटील ९ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करतो असा शब्द दिला होता. या पार्श्‍वभूमिवर तासगावातील ठिय्या आंदोलन थांबविले. पण त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांना ठेंगा दाखवलाय. त्यांनी शब्द पाळला नाही. १५ ऑगस्टच्या दिवशी मोर्चास परवानगी न दिल्याने मंगळवारी (ता. १७) रोजी मोर्चा काढला. मोर्चास पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

ChatGPT सांगणार कपडे तुमच्यावर कसे दिसतील? खरेदीआधीच पाहा लूक; असे वापरा 'Virtual Try-On' हे भन्नाट फिचर...

Latest Marathi News Live Update : विमान प्रवासादरम्यान प्रवाशाची प्रकृती गंभीर; डॉ. भागवत कराड यांनी तत्काळ धाव घेत दिली वैद्यकीय मदत

SCROLL FOR NEXT