Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetti esakal
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election : महायुती की महाविकास आघाडी? लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय

भाजपप्रणित महायुती (Mahayuti) आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी गटाकडून आपल्याशी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अनुषंगाने संपर्क सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

'मला राजकारणात करिअर करायचे नव्हते किंवा यापुढेही करायचे नाही. मला जे करायचे होते, ते करून झाले आहे.'

इस्लामपूर : ‘‘सत्ताधारी भाजपप्रणित महायुती (Mahayuti) आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी गटाकडून आपल्याशी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अनुषंगाने संपर्क सुरू आहे. दोघांनीही त्यांच्याबरोबर येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे; मात्र मी कोणाहीबरोबर जाणार नाही. मला त्यांच्यात रस नाही, मी स्वतंत्र लढणार आहे,’’ असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी बुधवारी केले.

वाळवा तालुक्यातील शेतकरी (Farmer) व कार्यकर्त्याची भेट त्यांनी घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविणार निवडणूक आणि तयारीच्या पार्श्वभूमीवर शेट्टी म्हणाले, ‘‘माझी निवडणूक अथवा उमेदवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व ग्रामीण भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आहे.

मला राजकारणात करिअर करायचे नव्हते किंवा यापुढेही करायचे नाही. मला जे करायचे होते, ते करून झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केली होती आणि मी त्यावर आधीपासून ठाम आहे.’’

मला राजकारण करायचे नाही. मी सर्वसामान्य घटक, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.

-राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT