Pandharpur
Pandharpur 
पश्चिम महाराष्ट्र

स्वाभिमानाच्या चक्काजाम आंदोलनाला पंढरपूर-विजापूर रस्त्यावर सुरवात

श्रीकांत मेलगे

मरवडे : यंदाचा गाळप हंगाम चालू होऊन 20 दिवस उलटून गेले तरी अद्याप साखर कारखान्यानी यंदाचा दर जाहीर केला नाही. तसेच यंदा तालुक्यता पाऊस कमी पडल्यामुळे तीव्र दुष्काळ पडला असून अजूनपर्यंत शासनाने अद्याप दुष्काळावर उपाय योजना केल्या नाहीत. त्या लवकरात लवकर कराव्या व यंदाचा ऊस दर त्वरीत जाहीर करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टींनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला सुरवात केली असून, उसाचा दर अगोदर जाहीर करावा व नंतर ऊस तोड चालू करावी. म्हणून आज स्वाभिमानीच्या वतीनं मरवडे येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यामुळे पंढरपूर ते विजापुर महामार्गावर वाहतूकीच्या रांगा लागल्याने वाहतूक थांबली.

या वेळी तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार मंगळवेढा पंढरपूर विधानसभा अध्यक्ष राहुल घुले युवा आघाडी कार्याध्यक्ष आबा खांडेकर, संतोष बिराजदार, अरळीचे मल्लिकार्जुन भांजे, लक्ष्मण सावंत, शांताप्पा कुंभार, गंजू पुजारी, नंदूर शाखाध्यक्ष शंकर संगशेट्टी, अरळीचे माजी सरपंच मळसिद्ध कुंभार, शिवाजी भांजे, मल्लिकार्जुन सोमगोंडे, सिद्धापूरचे माजी तालुकाध्यक्ष अनिल बिराजदार, आप्पासाहेब पाटील, सिद्धाराम व्हन्नुटगी, रतन रजपूत, किसन राठोड व हजारो शेतकरी उपस्थित आहेत. या वेळी मतदार संघ अध्यक्ष अॅड. राहुल घुले बोलताना म्हणाले, की सोलापूरच्या कारखानदारांनी या हि वर्षी अभद्र युती केली असून शेतकरी हा हुमणी आणि दुष्काळाने अडचणीत असताना कारखानदार शेतकरयांना अधिक अडचणीत आणत आहेत व सहकारमंत्री सोलापूर जिल्ह्यतील असताना स्वतः कारखानदार असताना ऊस तोडगा काढणे सोडून बघ्याची भूमिका घेत आहेत.

तर तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार म्हणाले, की कारखानदाराणी आमचा सय्यम तुटत चालला असून लवकरात लवकर दर जाहीर करा व शासनाने दुष्काळ भागात उपाययोजना त्वरित जाहीर करा. अन्यथा या पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT