shirala sugar farm.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा पश्‍चिम भागात रानडुकरांचा धुडगूस

सकाळवृत्तसेवा

शिराळा (सांगली)- तालुक्‍यातील आरळापैकी इनामवाडी येथे मारुती गंगाराम चौगुले यांच्या शेतातील नऊ गुंठ्यातील उसाचे रानटी डुकरांनी मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. 

शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. ही डुकरे रात्रीच्यावेळी अनेक ठिकाणी पिकांमध्ये घुसून नुकसान करत आहेत. रात्रीच्यावेळीच रान डुकरे नुकसान करत असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे शक्‍य होत नाही. तसेच रान डुकरांकडून हल्ला होण्याची शक्‍यता असल्यामुळे कोणी धाडस करत नाहीत. आरळापैकी इनामवाडी येथे चौगुले यांच्या शेतात नऊ गुंठ्यातील ऊसाचे रान डुकराने नुकसान केले. त्या ठिकाणचे वन विभागामार्फत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शिराळा हा तालुका अतीपावसाचा तालुका आहे. गतवर्षी अतिवृष्टी व महापूर यामुळे तालुक्‍यातील लोकांची 100 टक्के पिके वाया गेली होती. यावर्षीही रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यास सुरुवात केली असल्याने शेतकरी मेताकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : दुर्दैवी अंत! ४ महिन्यांच्या मुलीसह मायलेकांनी विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन; पाबळमधील हृदयद्रावक घटना

Latest Marathi News Live Update : आज ठरणार नाशिकचा नवा महापौर, कुणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

Paragliding Destinations: तुम्हालाही आकाशातून जग पाहायचंय? भेट द्या या 5 अप्रतिम पॅराग्लायडिंग डेस्टिनेशन्सना

रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी!

Kolhapur ZP : सा. रे. पाटील यांच्या ताकदीने इतिहास घडला; यशोदा कोळी अध्यक्षपदी, त्यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT