पश्चिम महाराष्ट्र

अशी लक्षणे दिसताच घ्या डाॅक्टरांचा सल्ला; कोरोना होईल बरा

सकाळ वृत्तसेवा

लेंगरे (सांगली) : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona)आली असून या विषाणूमुळे असंख्य जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोविड सेंटर व रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन सिलिंडर यांची कमतरता निर्माण होत आहे. त्यातच योग्यवेळी ऑक्सिजन (Oxygen) न मिळाल्यामुळे अनेक जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. विशेष म्हणजे अनेकजण ऑक्सिजनची पातळी खालावल्यानंतर रुग्णालयात धाव घेतात. परंतु, शरीरातील ऑक्सिजनची मात्र कमी होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. ते वेळीच ओळखणं गरजेचं आहे. म्हणूनच शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास शरीरात अनेक बदल होतात.

Symptoms of decreased oxygen levels covid 19 update sangli marathi news

किरकोळ लक्षणे असल्याला लोकांनी लवकर टेस्ट करून निदान करणे गरजेचे आहे. जितका उशीर तितका धोका जास्त आहे. सद्य:स्थितीत ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. त्यामुळे लवकर निदान केल्यास लवकर बरे होण्यास मदत होणार आहे. परिस्थिती अवघड आहे, असे वैद्यकीय विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इशारा देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे यापुढे विनाकारण बाहेर न पडता आपली आपल्या कुटुंबातील व्यक्तीने काळजी घेतल्यास या महामारीला थोपविणे शक्य होणार आहे.

अशी आहेत लक्षणे

शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याची लक्षणे शरीरावर उमटतात. यामध्ये प्रथम ओठांचा रंग बदलतो. ओठांवर निळ्या रंगाची झाक येते. याला स्यानोसिसचं लक्षणदेखील मानलं जातं. जर शरीरात ऑक्सिजनची पातळी योग्य असेल तर चेहरा गुलाबी, टवटवीत दिसतो. जर ऑक्सिजन कमी झाल्यास छातीत अचानक दुखू लागते, चेहरा उतरतो, श्वास घेण्यास त्रास होणे, अडथळा जाणवणे, अस्वस्थ वाटणे, तीव्र डोकेदुखी, सतत खोकला येणे.

शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर सामान्यपणे अशी काही लक्षणे जाणवतात. त्यामुळे यापैकी कोणतंही लक्षण जाणवल्यास वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घेतल्यास कोरोनावर यशस्वीपणे मात करणे सहजरीत्या शक्य होणार आहे. प्रशासनाने घातलेल्या नियमांचे पालन करून घरी राहून काळजी घेणे हीच काळाची खरी गरज आहे.

Symptoms of decreased oxygen levels covid 19 update sangli marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s Premier League: महिला प्रीमियर लीगचा धडाका आजपासून; डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार पहिला टप्पा !

Tiger Reserve New Rules : आता वाघाचा फोटो काढणं पडणार महागात! ‘या’ व्याघ्र प्रकल्पाने लागू केले कडक निर्बंध, काय आहेत नवे नियम?

Flipkart Republic Day 2026 सेल या तारखेपासून होणार सुरु, आयफोनसह हे 5G फोन स्वस्तात करु शकाल खरेदी

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला ऑफिससाठी पारंपरिक लूक हवाय? काळ्या साड्यांचे हे ७ स्टायलिश पर्याय तुमच्यासाठी ठरतील परफेक्ट

Asaduddin Owaisi : 'ते शरद पवार यांचे झाले नाहीत, मग जनतेचे काय होणार?' खासदार असदुद्दीन ओवैसींचा अजित पवारांवर थेट हल्ला

SCROLL FOR NEXT