T-55 tank of war of 71 In Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत ७१ च्या युद्धाचा ‘टी-५५’ रणगाडा

उद्यानाला गतवैभव प्राप्त होईल

विकास खिलारी

सांगली - येथील प्रतापसिंह उद्यानात १९७१ च्या युद्धात वापरलेला रणगाडा दाखल झाला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा या उद्यानाला गतवैभव प्राप्त होईल, अशी आशा आहे. गेली काही दिवस सांगलीत माळ बंगल्यावर त्याची रंगरंगोटी सुरू होती. सुमारे ३७ टन वजनाच्या या रणगाड्यामुळे भारतातील लष्कराच्या पराक्रमालाही उजाळा मिळणार आहे.

रणगाड्यासाठी येथे देखणा चबुतरा तयार करण्यात आला आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. उद्यान परिसरात चिमणीघर, तसेच ‘शिवसृष्टी’चे नियोजनही आहे. या रणगाड्याची भारत सैन्यात ‘टी-५५’ अशी ओळख होती. त्याचे बूम आजही हलते आहे. त्यांचे इंजिन मात्र काढून ठेवले आहे. १९७१ च्या युद्धात हा रणगाडा पाक-राजस्थान सीमाभागातील ‘परबत अली’ भागात होता. या रणगाड्याने त्यावेळी मोठा पराक्रम गाजवला होता. मेजर जनरल नवीनकुमार यांच्या प्रयत्नामुळे हा रणगाडा मोफत सांगलीकरांना मिळाला आहे. नवीनकुमार सांगलीत महापुराच्या काळात मदतकार्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी महापालिका प्रशासनाला सहकार्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर हा रणगाडा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT