Takari water scheme saved; Struck by Power supply; Picture at Alsand area 
पश्चिम महाराष्ट्र

ताकारी ने तारले; विजेने मारले; आळसंद परिसरातील चित्र

दीपक पवार

आळसंद (जि. सांगली) : आळसंद परिसरात ताकारी योजनेचे पाणी आवर्तन सोडले आहे. पंरतु विजेच्या सतत लंपडावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ताकारीच्या पाण्याने तारले तर वीज मारले. अशी विचित्र अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी आहे. 


परिसरातील बलवडी, आळसंद, तांदळगाव, वाझर, कमळापूर गावांना ताकारी योजनेचे पाणी लाभदायी ठरले आहे. ताकारी योजनेचे आवर्तनाचे पाणी येरळा नदीत सोडले आहे. यामुळे बळिराजा स्मृती धरण व वाझरचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याने तुडुंब भरला आहे. पंरतु वीज पुरवठा सुरळीत नसल्याने उपलब्ध पाण्याकडे शेतकऱ्यांना केवळ पाहत बसवे लागत आहे.

ताकारी व आरफळ योजनेच्या पाण्याच्या भरवश्‍यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बागायती केल्या आहेत. ऊस, केळी, भाजीपाला, मका यासह विविध पिके घेतली आहेत. त्यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. विद्युत पंपाची वीज सतत ये-जा करीत असल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आहे. 

कोरड घशाला पाणी उशाला
वीज सतत ये-जा करीत आहे. वीज सुरळीत करावी. असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. अशी परिस्थितीत शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. 
ताकारी योजनेचे पाणी येरळात आले आहे. परंतु वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. उपलब्ध पाण्याकडे केवळ हाताशपणे पाहत बसावे लागत आहे. एकंदरीत कोरड घशाला पाणी उशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
- संतोष जाधव, शेतकरी बलवडी (भा.) 

लवकरच वीज पुरवठा सुरळीत

उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी एकाच वेळी विद्युत पंप सुरू करतात. शिवाय फिडरवर क्षमतेपेक्षा जास्त विद्युत पंप आहेत. त्यामुळे विद्युत दाब वाढल्याने वीज सतत ये- जा करत आहे. लवकरच वीज पुरवठा सुरळीत केली जाईल. 
- अंकुश तारळेकर, शाखा अभियंता महावितरण वीज कार्यालय, आळसंद. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol and Diesel: जीएसटी रिफॉर्म लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? दिवाळीनंतर काय महाग होणार?

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, परळ-दादर रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

"मग त्याने एकट्यानेच आर्थिक बाजू का सांभाळावी" तेजश्री प्रधानने टोचले आजच्या तरुणींचे कान, म्हणाली...

Pune News : कोथरुड पोलिसांवर आरोप करणाऱ्या तीन तरुणींसह ५ जणांवर गुन्हा दाखल, मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट....

फक्त एक क्लिक...अन् फोनपासून बँक अकाउंटपर्यंत सगळं होईल हॅक, नव्या Captcha Scam चा हाहाकार, 'असं' रहा सुरक्षित

SCROLL FOR NEXT