anna hazare 
पश्चिम महाराष्ट्र

माझे पोलिस संरक्षण काढून घ्या 

सकाळ वृत्तसेवा

राळेगणसिद्धी : "हार्ट ऍटॅकने मरण्यापेक्षा समाजासाठी मरण आले, तर माझे भाग्य समजेन. त्यामुळे मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको. मला दिलेले पोलिस संरक्षण काढून घ्यावे. माझे काही बरे-वाईट झाले, तर त्याला मीच जबाबदार राहीन,'' असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
 
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार विराजमान होऊन जवळपास एक महिना होत आला असून, नव्या सरकारने राज्यातील प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत. राज्य सरकारच्या सुरक्षा समितीने राज्यातील 90 मान्यवरांच्या सुरक्षेचा आढावा घेतला व आवश्‍यकतेनुसार सुरक्षेत बदल केले आहेत. त्यात हजारे यांना "झेड' सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हजारे यांना आधी "वाय प्लस' दर्जाची सुरक्षा होती. 

सरकारने एकीकडे अण्णांच्या सुरक्षेत वाढ केली असताना, अण्णांनी यावर आज आपली भूमिका लिखित स्वरूपात स्पष्ट केली. "मला कोणत्याही सुरक्षेची गरज नाही,' असे त्यांनी म्हटले आहे. "माझे पोलिस संरक्षण काढून घ्यावे, सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर माझे काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी माझीच असेल,' असेही अण्णांनी पत्रात नमूद केले आहे. यावर आता राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"आंध्र'प्रमाणेच कायदा व्हावा 
"देशात महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटनांत अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढच होत आहे. सध्याच्या प्रचलित न्यायव्यवस्थेतून आरोपीस शिक्षा मिळण्यास प्रदीर्घ विलंब होतो, हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात ज्याप्रमाणे 21 दिवसांच्या आत संबंधित आरोपीवर खटला चालवून शिक्षा करणे बंधनकारक केले, तोच कायदा सर्वत्र केल्यास महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होईल,'' अशी भूमिका सरपंच परिषदेच्या पदाधिकारी अश्विनी थोरात यांनी आज मांडली.

महिलांवरील वाढते अत्याचार व फाशीच्या शिक्षेस होणारा विलंब याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या मौन आंदोलनाच्या आठव्या दिवशी आजही राज्याच्या विविध भागांतील कार्यकर्ते व महिलांनी हजारे यांची भेट घेतली. मुंबई, शिर्डी, जालना, अंबेजोगाई, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, तसेच जिल्ह्यातील अनेक भागांतील कार्यकर्ते व महिलांनी आज हजारे यांना भेटून आंदोलनास पाठिंबा दिला. हजारे यांनी सर्वांशी लेखी संवाद साधला. 

वाचा - जळाऊ लाकडासह चौदा ट्रक जप्त 
 
तृप्ती देसाई यांनी घेतली भेट 
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही आज सायंकाळी हजारे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. देसाई म्हणाल्या, ""मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार करून याबाबत सरकारचे लक्ष वेधणार आहे. राज्य व केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारच्या "दिशा' कायद्याप्रमाणे कोपर्डीच्या पीडितेच्या नावे कायदा करून 21 दिवसांत आरोपींना फाशी देणारा कायदा करावा, अशी आपली मागणी आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT