exam.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

गुणवत्तेसाठी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्या : "सिनेट' सदस्यांची मागणी 

सकाळवृत्तसेवा

सांगली-  देशातील अनेक राज्यात विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात जर सरासरी गुणांवर उत्तीर्ण करायचे ठरवल्यास राष्ट्रीय पातळीवर येथील विद्यार्थ्यांना कमीपणा येईल. स्पर्धेत येथील विद्यार्थी मागे पडतील. त्यामुळे गुणवत्ता टिकवण्यासाठी अंतिम सत्राच्या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी शिवाजी विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्य संजय परमणे व विशाल गायकवाड यांनी केली आहे. 


राज्य शासनाने नुकतेच कोविड 19 च्या काळातील अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता सरासरी गुणांवर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विद्यापीठ स्तरावरून विरोध होऊ लागला आहे. अनेक शिक्षणप्रेमी पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्थाचालक यांनी निर्णयाच्या विरोधात मते मांडली आहेत. सिनेट सदस्यांशी देखील अनेकांनी संपर्क साधून या निर्णयाला विरोध करण्याची मागणी केली आहे. 


वास्तविक इतर अनेक राज्यांमध्ये विद्यापीठाची अंतिम सत्राची परीक्षा घेतली जाणार आहे. फक्त महाराष्ट्रात जर सरासरी गुणांवर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे ठरवल्यास राष्ट्रीय पातळीवर येथील विद्यार्थ्यांना कमीपणा येईल. स्पर्धेच्या जगात महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडतील अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. भविष्यात 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कायमचे लाजीरवाणे वाटू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. अनेक विद्यार्थी अंतिम सत्रात भरपूर अभ्यास करून चांगले गुण मिळवून सरासरी वाढवण्याची तयारी करतात. तसेच नोकरीसाठी अंतिम वर्षाचे गुण विचारले जातात.

अंतिम सत्रामध्ये प्रोजेक्‍ट वर्क, प्रेझेंटेशन, ओरल आदी गोष्टी असतात. त्यासाठी सरासरी गुण कसे देता येतील? असे अनेक प्रश्‍न असून त्याची उत्तरे विद्यापीठाला देता येणार नाहीत. त्यामुळे सरासरी गुणांवर उत्तीर्ण करण्याचा निर्णय रद्द करून येणाऱ्या कालावधीत परीक्षावर आधारीत गुणांवर उत्तीर्ण करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच विद्यार्थी व पालकांच्या मनातील गोंधळ दूर करावा अशी मागणी श्री. परमणे व श्री. गायकवाड यांनी केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT