market yard.JPG 
पश्चिम महाराष्ट्र

इकडे लक्ष द्या...हळद-गुळाचे सौदे लांबणीवर : यार्डात हमालही काम बंद ठेवणार 

सकाळवृत्तसेवा

सांगली- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद व गुळाचे सौदे मंगळवार (ता.21) पासून सुरू होणार होते. परंतू सांगलीत कोरोना चा पहिला बळी गेल्यामुळे सौदे लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती सभापती दिनकर पाटील यांनी दिली. तसेच मार्केट यार्डातील सर्व हमाल सोमवारपासून काम बंद ठेवणार असल्याचेही हमाल पंचायतीचे विकास मगदूम यांनी सांगितले आहे. 


"कोरोना' मुळे लॉकडाऊनचा दुसरा टप्पा वाढवताना सरकारने कृषी आणि उद्योग व्यवसायात शिथिलता आणण्याचे जाहीर केले होते. त्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगलीत बाजार समितीमध्ये गुळ व हळदीचे सौदे सुरू करण्यात येणार असल्याचे सभापती श्री. पाटील यांनी जाहीर केले होते. सध्या लॉकडाऊनमुळे बाजार समितीची रोजची 25 कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकरी, व्यापारी आणि हमाल आदींवर आर्थिक संकट आले आहे. मार्केट यार्डात केवळ होलसेल किराणा दुकाने सुरूच आहेत. केंद्र सरकारच्या सुचनानुसार मंगळवार (ता.21) पासून गुळाचे सौदे काढण्यात येणार होते. त्यासाठी बाजार समिती व व्यापारी आदींनी नियोजन केले होते. त्याच दिवशी हळदीच्या सौद्याबाबत तारीख निश्‍चित करण्यात येणार होती. परंतू सांगलीत कोरोना पहिला बळी गेल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर हळद व गुळाचे सौदे पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सभापती श्री. पाटील यांनी सांगितले. 


दरम्यान मार्केट यार्डातील सर्व हमालांनी देखील सोमवार (ता.20) पासून हमाली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सूचना येईपर्यंत यार्डातील हमाल कामावर येणार नाहीत. हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांनी ही माहिती दिली. त्यामुळे ग्रामीण भागातून मार्केट यार्डात होलसेल किराणा मालासाठी येणाऱ्या दुकानदारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT