take over the grampanyat working only for one day and she dead in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

दुर्दैव ; सरपंचपदाची माळ गळ्यात पडली पण आयुष्याची दोरी मात्र तुटली

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : ग्रामपंचायत अध्यक्षपदाची माळ बिनविरोध गळ्यात पडली. पण, अधिकाराचा उपभोग घेण्यापूर्वीच बडस खुर्द ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सुशिलव्वा रामचंद्र अलाबादी (वय 70) यांना इहलोकाची यात्रा करावी लागली आहे. केवळ एक दिवसाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. नवनिर्वाचित अध्यक्षा सुशिलव्वा यांचा काल (ता. 3) हृदयविकाराने निधन झाले. 

सुशिलव्वा यांनी बडग ग्रामपंचायतीमध्ये पाच वेळा निवडून येण्याचा मान मिळविला आहे. मात्र मागील निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. वयाच्या सत्तराव्या वर्षात देखिल त्यांनी यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती. यात मतदारांनी त्यांच्याबाजूने कौल दिला होता.

ग्रामपंचायतीमध्ये विजयी ठरल्यानंतर 2 फेब्रुवारी रोजीच पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे त्यांचा गावात जंगी सत्कारही करण्यात आला होता. पण, केवळ एकच दिवसाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर काल (ता. 3) हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यामागे मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तालुका पंचायत सदस्य महांतेश अलाबादी यांच्या त्या मातोश्री होत. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT