covid hospital.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोविड रुग्णांसाठी आणखी कार्यालये-हॉल ताब्यात घ्या...पालकमंत्री पाटील : महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलचे उद्‌घाटन 

जयसिंग कुंभार

सांगली-  कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी मंगल कार्यालये- हॉल ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार तसेच अलगीकरणासह सर्व वैद्यकीय उपचाराच्या जास्तीत जास्त सुविधा निर्माण कराव्यात अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज केली. महापालिकेच्यावतीने येथील कोल्हापूर रस्त्यावरील अदिसागर मंगल कार्यालय सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे त्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्‌घाटन झाले. 

सुमारे 120 खाटांचे हे रुग्णालय उद्यापासून महापालिका क्षेत्रातील रुग्णांसाठी मोफत उपलब्ध असेल. राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांनीही ऑनलाईन या कार्यक्रमात सहभाग घेतला. महापौर गीता सुतार, आयुक्त नितिन कापडणीस, राष्ट्रवादीचे गटनेते मैन्नुदीन बागवान, भाजपचे गटनेते युवराज बावडेकर, कॉंग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर आदी यावेळी उपस्थित होते. 
पालकमंत्री पाटील म्हणाले,"" ही वेळ संकटाची आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. मालेगाव-भिवंडीसारख्या गर्दीच्या शहरांमधील साथ आता आटोक्‍यात आली आहे. त्यांचे अनुकरण आपल्याकडेही केले पाहिजे.'' राज्यमंत्री कदम यांनी महापालिकेसाठी आवश्‍यक ती सर्व मदत राज्य शासन देईल असे आश्‍वासन दिले.

खासदार पाटील यांनी महापालिकेचे हे काम लोकोपयोगी असून या कामासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही असे सांगितले.जिल्हाधिकारी अभिजित चौधरी म्हणाले,"" महापालिकेने अल्पावधीत केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांनी आता आणखी एक हॉस्पिटल उभे करण्यासाठी कार्यवाही सुरु करावी. रुग्णांसाठी अन्यही सुविधा देण्यासाठी आवश्‍यक ती शासकीय मदतही दिली जाईल.'' 
आयुक्त कापडणीस म्हणाले,"" 120 पैकी 20 बेड संशयित कोविड रुग्णांसाठी असतील. सात दिवसात हॉस्पिटल उभे करण्यात आले. सर्व शंभर खाटांना ऑक्‍सिजन सुविधा असेल. चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी शहरातील सर्व फिजिशियन तयार आहेत.'' 

सुरेश आवटी यांची चौकशी 
कोरोनातून मुक्त होऊन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ऑनलाईन चौकशी केली. पालकमंत्र्यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. जयंत पाटील म्हणाले,"" सुरेशबापूंना पुण्याला नेल्याचे समजले आणि आमची चिंता वाढली. घोटाळा होतो की काय अशी भिती आम्हाला वाटली. पण बापूंनी कोरोनावर मात केली. आता ते जोमाने समाजसेवा सुरु करतील.'' जयंतरावांच्या या टिपणीवर श्री. आवटी यांच्यासह सर्वांनी हसून दाद दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup: इटली सलग तिसऱ्यांदा स्पर्धेतून बाहेर; 48 संघ खेळणार मुख्य स्पर्धा; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Explained: इराण अमेरिकेची नांगी ठेचणार? प्लॅन B काय? आता जगालाही हादरा बसणार! १८ कंपन्यांना धमकीमागची खरी स्टोरी काय?

पाच दिवसांत आरोपपत्र अन् १६ दिवशी थेट निकाल! सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Ready Reckoner Rates: महायुती सरकारने रेडी रेकनर स्थिर ठेवण्याचा निर्णय का घेतला? उत्तर आलं समोर...

Latest Marathi News Live Update : सांगली ZP विषय समिती निवडी बिनविरोध; महाविकास आघाडीची सरशी

SCROLL FOR NEXT