Talathi Beaten in Soradi Thirteen people were charged
Talathi Beaten in Soradi Thirteen people were charged 
पश्चिम महाराष्ट्र

सोरडीत तलाठ्याला बेदम मारहाण; तेरा जणांवर गुन्हा दाखल

बादल सर्जे

जत : सोरडी (ता. जत, जि. सांगली) येथे वाळू लिलाव प्रक्रियेत सहभागी व्यक्तीस व्यवहार पूर्ण करण्याची सूचना देण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला विळती, काठी व लाथाबुक्‍यांनी गंभीर मारहाण झाली. सात तोळ्याचे दागिने, रोख पाच हजार, मोबाईल, दोन लाख 25 हजारांचे दागिने काढून घेतले. बाळासाहेब शंकर जगताप (वय 53, विद्युत कॉलनी, जत) असे मारहाण झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. जगताप यांची करंगळी तुटली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे व गंभीर मारहाणीचा जत पोलिस ठाण्यात तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मण पुतळाप्पा चाबरे, मनगिनी पुतळाप्पा चाबरे, लक्ष्मण यांच्या दोन्ही पत्नी, मनगिनी याची पत्नी, गौराबाई पुतळाप्पा चाबरे, राहूल लक्ष्मण चाबरे, विकास मनगिनी चाबरे, राजू चाबरे व लक्ष्मण याची दोन मुले, बिरा शंकर चाबरे व त्याची आई, अशा तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 


मनगिनी चाबरे वाळू तस्करी करत होता. अप्पर तहसीलदारांनी त्यांच्यावर कारवाई करत 35 लाखांचा दंड ठोठावला आहे. तो न भरल्याने त्यांच्या मालमत्तेवर तो बोजा चढवून जमिनीवर शासनाचे नाव लावले. आठ दिवसांपूर्वी संख अप्पर तहसील कार्यालयामार्फत वाळूचा लिलाव घेण्यात आला होता. मनगिनीने सहभाग घेत चार ब्रास वाळू घेतली. मात्र, लिलावाची रक्कम व वाळू घेऊन गेला नाही.

अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांनी सोरडीचे तलाठी बाळासाहेब जगताप यांना चाबरे यांना व्यवहार पूर्ण करण्यास सांगण्याचा आदेश दिला. ती सूचना देण्यासाठी जगताप गेले असता घराच्या बांधकामासाठी मनगिनीचा भाऊ लक्ष्मण चाबरे यांनी पाच ते सहा ब्रास वाळूचा साठा केल्याचे दिसून आले. जगताप यांनी वाळू कोठून आणल्याची विचारणा केली. लक्ष्मणने उडवा उडवीची उत्तरे दिली. जगताप यांनी वाळूची छायाचित्रे घेतली व निघून गेले. 


दरम्यान, लक्ष्मण यांनी भाऊ मनगिनीसह नातेवाईकांना बोलावले. जगताप देवाच्या पावदकाच्याजवळ गेले असता लक्ष्मणसह संशयितांनी विळती, काठी व लाथाबुक्‍यांनी गंभीर मारहाण केली. विळतीने केलेला वार हातावर घेतल्याने जगताप यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली आहे. जगताप जखमी झाले. घटना समजताच अप्पर तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होत जगताप यांना जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले. बाळासाहेब जगताप यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन : युवराज यादव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: पोर्श अपघात प्रकरणी ससूनचा डॉक्टर तावरेच्या घरी पोलिसांंची धाड

Nana Patole : गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा - नाना पटोले

Pune Porsche Accident: 'पाहिजे तेवढे पैसे घ्या पण, मारू नका...', पोर्श अपघातातील आरोपी काय ओरडत होता? वाचा, प्रत्यक्षदर्शीच्या शब्दांत

Sakal Podcast : वेळेपूर्वीच केरळमध्ये धडकणार मान्सून ते अमेरिका लवकरच होणार क्रिकेटमय

‘एसडीआरएफ’ पथकांची संख्या वाढविणार; मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय

SCROLL FOR NEXT