पश्चिम महाराष्ट्र

कलावंत म्हणतात...पोटासाठी नाचायचेय; पण...

सकाळ वृत्तसेवा

उंब्रज (जि.सातारा)  ः येथील तमाशा फड मालकांना व कलावंतांना यावर्षी कोरोनामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून, लॉकडाउनमुळे पोलिस बाहेर पडू देईनात आणि घरात पोटाचे हाल काही थांबेनात, अशीच अवस्था उंब्रज व कोर्टीतील कलावंतांची झाली आहे.
 
उंब्रज व कोर्टी येथील कलावंतांची गावोगावी यात्रा आणि जत्रांमध्ये करमणुकीसाठी तमाशा सादर करण्याची परंपरा आहे. यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे गर्दी आणि कार्यक्रम टाळण्यासाठी शासनाने यात्रा, जत्रा रद्द केल्या आहेत. त्यामुळे तमाशांचे बुकिंगही रद्द झाले आहे. फड मालकांनी तमाशा फड चालवण्यासाठी लाखो रुपये हातउसणे घेतले असून, हे कर्ज फेडायचे कसे? तमाशाच बंद झाल्याने करायचं काय? हा सध्या फड मालक व कलावंतांपुढे प्रश्‍न आहे.
 
तमाशा कलावंतांचे उंब्रज हे हक्काचे ठिकाण. दर वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गावच्या जत्रेचे करार करण्यासाठी गावपुढारी येथे येतात. गेल्या वर्षी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तमाशाचे कार्यक्रम रद्द झाले, तर यावर्षी कोरोनाची स्वारी आल्याने कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे फड मालक व कलावंत चिंतेत आहेत. या कलावंतांकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले असून, शासनाने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 


दुष्काळ, महापूर, निवडणुका आणि यावर्षी कोरोगाच्या संकटामुळे तमाशा बुकिंग झाले नाही. यात्रा- जत्रेत तमाशा न झाल्यास आम्ही जगायचं कसं? असा प्रश्न सगळ्या कलावंतांपुढे आहे. अनेक कलावंतांची रेशनिंग कार्ड बंद असल्याने धान्य मिळत नाही. त्यामुळे शासनाने तमाशा कलावंतांसह फड मालकांनाही विशेष अनुदान द्यावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : शिरपूरमध्ये विद्युत तारांमुळे आग! एक एकरातील बांबू जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT