download (1).jpg 
पश्चिम महाराष्ट्र

तानाजीची आयपीएल  धून... वाजलीच नाही...

दिपक पवार

आळसंद (सांगली )  : रामापूर (ता. कडेगाव ) येथील कलावंत तानाजी माने यांची यंदा जोतिबाच्या डोंगरावर वाजणारी आयपीएल धूम कोरोनामुळे वाजली नाही. सलग आठ ते दहा वर्षांपासून वाजवली जाणारी धूम न वाजल्याने तानाजीच्या मनाला हुरहूर लागली आहे.

 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगरावर दख्खनचा राजा असणारा जोतिबाची यात्रा 121 वर्षां नंतर खंडीत झाली. तानाजी माने हा हरहुन्नरी कलाकार . आपल्या टंपेंटच्या सहाय्याने आयपीएल च्या धूनवर आबालवृद्धांना गतवर्षी ठेका धरायला लावला होता. यावेळी कोरोना या ससंर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला... संवेदनशील असणार्या तानाजीला वाईट वाटले. त्याने वाजवलेली आयपीएल धूमला सोशल मीडियात लाखो लाईक मिळाल्या होत्या. तो दहा वर्षांपासून गावातील सासनकाठ्याबरोबर आपलं वाद्य घेऊन नियमित जात असे. 

तानाजी माने हे येरळाकाठावर वसलेल्या रामापूरचे. वडिलांनी वयाच्या 14 व्या वर्षी बॅन्ड मध्ये मदतीला घेतले अन्‌ कलेशी नाते जोडले ते कायमचे. तानाजी कलाबाज बनला. आयपीएल धूम वाजवल्यामुळे सोशल मीडियात चांगलाच फेमस झाला आहे. 
कोट : गेल्या आठ- दहा वर्षांपासून चैत्रातील पोर्णिमेला भरणार्या यात्रेला नियमित जात असतो. जोतिबाचं दर्शन घेत असतो. टंपेटं च्या साहाय्याने वाजवली जाणारी आयपीएल धूम वाजवताना वेगळी मज्जा येत असते. कोरोना मुळे यात्रा रद्द झाली आहे. याचं वाईट वाटतं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT