Target to Sangli district: 2 lakh 90 thousand tree plantations! 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्याला टार्गेट : 2 लाख 90 हजार वृक्षारोपणाचे!

घनशाम नवाथे

सांगली  : जिल्हाभर कोरोनाचे सावट असताना आणि लॉकडाऊनची परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला हा जिल्हा हिरवागार करायचा निर्धार वन विभागाने केला आहे. यंदा जिल्ह्याला 2 लाख 90 हजार झाडं लावायचं टार्गेट असून त्याचं नियोजन सुरू आहे. 


सांगली जिल्हा हा मुळातच निसर्गसंपन्न जिल्हा आहे. कृष्णा आणि वारणासह लहानलहान नद्या आणि ओढ्यांनी तो सदाबहार ठेवला आहे. अगदी दुष्काळी भागातही लोकांनी हिरवे पट्टे जपले आहेत. या निसर्गसंपदेत वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि संबंधित विभागांचे योगदानही मोठे आहे. दरवर्षी शासनाच्यावतीने जिल्ह्याला वृक्ष लागवडीचं टार्गेट दिले जाते. ते पूर्ण करण्यात अनेक अडचणी येतात, पण वृक्षारोपण होते.

यंदाही जिल्ह्याला 2 लाख 90 हजार झाडे लावण्याचे टार्गेट शासनाने दिले आहे. ते पूर्ण करण्यात मुख्यत्वे जबाबदारी वनविभागाची असते. त्यानुसार या विभागाचे नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील 210 हेक्‍टर क्षेत्रावर हे वृक्षारोपण करण्यात येत असून त्यामध्ये साऱ्यांचा सहभाग मोलाचा असल्याचं मत उप वनसंरक्षक अधिकारी प्रमोद धानके यांनी व्यक्त केले. 

वनक्षेत्र, नियोजन तयार 
जिल्ह्यात खानापूर-विटा तालुक्‍यात करंजे, खंबाळे, भूड, पळशी या चार वनक्षेत्राखालील 45 हेक्‍टर क्षेत्रावर 72 हजार, सांगली परिक्षेत्रातील हिंगणगाव, हरोली, अलकूड एस, धुळगाव या वनक्षेत्राखालील 60 हेक्‍टरवर 96 हजार, जत तालुक्‍यातील मिरगाव, सोरडी या दोन वनक्षेत्राखालील 50 हेक्‍टरवर 80 हजार, तासगाव तालूक्‍यातील वडगाव या एका वनक्षेत्राखालील 15 हेक्‍टरवर 24 हजार, तर शिराळा तालुक्‍यातील रिळे, गोटखिंडी, गिरजवडे, उपवळे या चार क्षेत्राखालील 40 हेक्‍टरवर 18 हजार 60 वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. 

सवलतीच्या दरात रोपेही उपलब्ध

सांगली जिल्हा वनराई, निसर्गसंपत्ती आणि वृक्षसंपदेनं समृद्ध करण्यासाठी या मोहिमेत साऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, शाळा, नागरिक या साऱ्यांनी रिकाम्या जागेत वृक्षारोपण करावे. त्यासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीनं सवलतीच्या दरात रोपेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये शिसव, करंज, चिंच, आवळा, बोर, वड, पिंपळ, खैर, बेल, शमी यासारखी रोपेही आहेत. नागरिकांनी ही रोपे घेऊन वृक्ष लागवड करावी. 
- प्रमोद धानके, उप वनसंरक्षक अधिकारी 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT