In Tasgaon, 42 out of 49 were corona negative; Strict response to Band 
पश्चिम महाराष्ट्र

तासगावमध्ये 49 पैकी 42 जण निगेटिव्ह; कडकडीत "बंद'ला प्रतिसाद 

सकाळवृत्तसेवा

तासगाव (जि. सांगली) : शहरात आज चौथ्या दिवशीही कडकडीत लॉकडाउन पाळण्यात आला. दरम्यान, त्या पाच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 49 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 42 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने काहीसा सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

तासगावात एकावेळी पाच जण कोरोना रुग्ण सापडल्याने पूर्ण शहर कंटेंन्मेंट झोन म्हणून पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. आज लॉकडाउनचा चौथा दिवस होता. तासगावकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या "बंद'ला पाठिंबा दिल्याने सर्व रस्ते रिकामे रिकामे दिसत होते. अपवाद वगळता एखाद- दुसरी मोटारसायकल रस्त्यावरून फिरताना दिसत होती. त्यातच बहुतांश रस्ते बॅरिकेड्‌स लावून बंद करण्यात आल्याने नागरिकांना चालत ये-जा करावी लागत आहे.

बफर झोनमधील व्यवहार 10 तारखेपर्यंत, तर कंटेन्मेंट झोनमधील व्यवहार 28 तारखेपर्यंत बंद राहणार आहेत. कंटेन्मेंट झोनमधील बॅंकाही बंद आहेत. 
त्या पाच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 49 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी सायंकाळपर्यंत 42 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप सात जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. या 42 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

दरम्यान, बोरगाव येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पाचपैकी चार जणांचे घेतलेले स्वॅब अहवाल निगेटिव्ह, तर एक प्रलंबित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT