पश्चिम महाराष्ट्र

तासगावमधील सराफासह चौघे तडीपार 

जयसिंग कुंभार

सांगली - संजयनगर परिसरात चेन हिसकावून घेण्यासारखे गंभीर गुन्हे केल्याप्रकरणी तासगावमधील खेराडकर सराफासह चौघांवर आज तडीपारीची कारवाई करण्यात आली.

टोळीचा म्होरक्‍या रौनक उर्फ विश्‍वजीत मुकुंद खेराडकर (20, खेराडकर वाडा, तासगाव), अनिल शिवाजी बाबर (31, खोतनगर, मिरज), अभि उर्फ रोहीत तानाजी चव्हाण (21, सरस्वती गल्ली, तासगाव) आणि कपील उर्फ प्रफुल्ल शशिकांत होवाळे (19, दत्त मळा गल्ली, तासगाव) या चौघांना सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातून वर्षासाठी तडीपार करण्यात आले.

एखाद्या सराफाला तडीपार करण्याचा हा दणका या व्यवसायातील गुन्हेगारांना इशारा मानला जात आहे. 
सोनसाखळी चोरांचा म्होरक्‍या रौनक याचा तासगावमध्ये सराफी व्यवसाय आहे. त्याचे साथीदारही तासगावचे आहेत. टोळीने 2017 पासून संजयनगर परिसरात जबरी चोरीसह गंभीर गुन्हे केल्याचे उघडकीस आले होते.

दरम्यानच्या काळात चौघेही कारागृहात होते. जामिनावर बाहेर आल्यानंतरही त्यांचा हा उद्योग सुरुच होता. चोरीचे सोने घेणे, स्वतः चेन स्नॅचिंग करणे व साथीदारांकडून चोरी करून घेणे यात रौनकचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेळोवेळी सहभाग होता. या टोळीने संजयनगर परिसरात धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली होती. 

आज अधीक्षक सुहैल शर्मा यांनी तडीपारीचा दणका दिला. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सिद्धापापा रूपनगर, विशाल भिसे यांचा कारवाईत सहभाग होता. 

आणखी गुन्हेगार रडारवर 
पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी उत्सवांपूर्वी गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिन्यात इस्लामपूर येथील शिवसेनेच्या नेत्याच्या भावासह 17 जणांना मटका आणि जुगारप्रकरणी तडीपार केले आहे. राजकीय लागेबांधे असलेले अनेक जण रडारवर आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT