Congress esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : प्रेस नोट वाटून खोटी माहिती पसरवू नका, भानगडींवर मी बोलणारच; काँग्रेस नेत्याचा थेट इशारा

बाजार समिती सभेत जे घडले ते सांगितले नाही. चुकीच्या प्रेस नोट काढून बदनामी केल्याचा कांगावा केला गेला.

सकाळ डिजिटल टीम

चुकीच्या कारभारावर चार प्रश्न विचारले, की बाजार समितीची बदनामी कशी होते?

तासगाव : खोट्या प्रेस नोट वाटून खोटी माहिती पसरवू नका. बाजार समितीतील भानगडीवर मी बोलणारच. बहुमताच्या जोरावर आवाज दाबला जाऊ शकत नाही, असा इशारा तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व काँग्रेसचे (Congress) तालुकाध्यक्ष महादेव पाटील (Mahadev Patil) यांनी दिला.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Tasgaon Krushi Utpanna Bazar Samiti) सभापती युवराज पाटील यांनी बाजार समितीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत महादेव पाटील यांना उद्देशून, ‘पेपरबाजी करून बाजार समितीची बदनामी करू नका,’ असे खडसावले होते. त्यावर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, ‘‘बाजार समिती सभेत जे घडले ते सांगितले नाही. चुकीच्या प्रेस नोट काढून बदनामी केल्याचा कांगावा केला गेला. चुकीच्या कारभारावर चार प्रश्न विचारले, की बाजार समितीची बदनामी कशी होते ?’’ ते म्हणाले, ‘‘मंगळवारी तासगाव बाजार समितीची पहिली सभा झाली. मी सत्ताधाऱ्यांच्या काही चुकीच्या गोष्टींवर आक्षेप घेतला. माझा या आक्षेपाने सत्ताधाऱ्यांनी, ‘तासगावच्या बाजार समितीचा लौकिक देशभरात आहे, आपण बदनामी करू नका,’ अशी आवई उठवली.

मात्र हे करत असताना मागील संचालक मंडळातील भ्रष्ट संचालकांना तत्काळ हाकला, असे पत्र डीडीआरनी काढले होते. त्याच भ्रष्टाचारी संचालकांना सुरेश पाटील यांनी निवडून आणले. त्यावेळी बाजार समितीचे बदनामी झाली नाही का? तीस वर्षे सत्तेत असणाऱ्यांनी पक्ष कार्यालयासाठी आठ लाख रुपये घालवले, संचालकांना गेस्ट हाऊस केले. मात्र शेतकऱ्यांना बसायला विश्रांतीगृह करायचे झाले नाही. त्यामुळे बाजार समितीची इज्जत वाढवली की घालवली, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे. चांगला कारभार करायचा असेल तर विरोधकांना बोलू द्या,’’ असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT