BJP MP Sanjay Patil supporter Sachin Patil joins Ajit Pawar group esakal
पश्चिम महाराष्ट्र

Tasgaon Politics : खासदार संजय पाटील गटाला मोठा धक्‍का; कट्टर समर्थक सचिन पाटील अजित पवार गटात

राष्ट्रवादीध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) मधे तासगाव तालुक्यात प्रवेश होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सचिन पाटील हे खासदार पाटील यांचे निकवर्तीय मानले जातात. मांजर्डे भागातील ते प्रमुख नेते होते.

तासगाव : खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांचे निष्ठावंत कट्टर समर्थक सचिन गणपतराव पाटील (Sachin Patil) यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते त्यांना तासगाव तालुका अध्यक्ष पदाचे पत्र देण्यात आले. खासदार पाटील गटाला हा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) मधे तासगाव तालुक्यात प्रवेश होत आहे. काही पदाधिकारी ही निवडण्यात आले आहेत मात्र तासगाव (Tasgaon Politics) तालुका अध्यक्ष निवड झालेली नव्हती, आज त्याला मुहूर्त लागला. मांजर्डे येथील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते सचिन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेसमधे प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार सदशिव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील उपस्थित होते. सचिन पाटील यांना तासगाव तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असून त्या आशयाचे पत्र उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते देण्यात आले. पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा लागेल ती मदत आणि ताकद तुमच्या पाठीशी उभी करू अशी निःसंदिग्ध ग्वाही अजित पवार यांनी दिली.

सचिन पाटील हे खासदार पाटील यांचे निकवर्तीय मानले जातात. मांजर्डे भागातील ते प्रमुख नेते होते. भाजपचे विसापूर मांजर्डे जिल्हा परिषद गटाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. खासदार पाटील यांना सचिन पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे धक्का मानला जात आहे. या निमित्ताने मांजर्डे विसापूर मंडलामध्ये वैभव पाटील यांचा आता स्वतंत्र थेट गट तयार होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haj Airfare Hike : हज यात्रेकरूंसाठी महत्त्वाची बातमी! विमानभाड्यात १०,००० ची वाढ; AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी संतापले, केंद्र सरकारवर केली सडकून टीका

Mumbai Local Block: नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द; मध्य व ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

IPL 2026 : “वैभव सूर्यवंशीची नेमकी कमजोरी शोधणे कठीण”; इयान बिशप यांनी RR च्या युवा फलंदाजाचे केले कौतुक

Mumbai Sea Transport: आखाती तणावाचा मुंबई सागरी वाहतुकीवर फटका; इंधनदरवाढीमुळे रो-रो व फेरी बोटींच्या भाडेवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT