Vishal Patil vs Sanjay Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

तासगावात खडाजंगी! खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले संजयकाका समर्थक; दोन्ही नेत्यांत जोरदार वादावादी

Tasgaon Politics : खासदार विशाल पाटील यांनी काढलेल्या तासगाव शहराच्या बाह्य वळण रस्त्याचा विषयाने वादाला सुरुवात झाली.

रविंद्र माने

हा सारा प्रकार तीन-साडेतीन मिनिटे सुरू होता. सुदैवाने पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टाळला.

तासगाव : तासगाव नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार विशाल पाटील (Vishal Patil) आणि माजी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्यात थेट वादावादी झाली. या वादावादीचं पर्यवसान कार्यकर्ते अंगावर धावून जाण्यात झाले. या घटनेचे जोरदार पडसाद उमटले आहेत.

आज तासगाव नगरपालिकेच्या (Tasgaon Municipality) नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, तहसीलदार अतुल पाटोळे, युवक नेते प्रभाकर पाटील यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Patil vs Sanjay Patil

यावेळी खासदार विशाल पाटील यांनी काढलेल्या तासगाव शहराच्या बाह्य वळण रस्त्याचा विषयाने वादाला सुरुवात झाली. खासदार संजय पाटील हे त्याला उत्तर देत असताना, उपस्थित कार्यकर्त्यांमधून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि कार्यकर्ते व्यासपीठाकडे खासदार विशाल पाटील यांच्याकडे धावून गेले. आणि एकच गोंधळ सुरू झाला. हा सारा प्रकार तीन-साडेतीन मिनिटे सुरू होता. सुदैवाने पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar: सरकार जरांगेंसमोर झुकलं! आता जीआर रद्द केल्याशिवाय थांबू नका, विजय वडेट्टीवार कडाडले

Leopard Attack Kolhapur : पन्हाळ्याच्या पायथ्याशी बिथरलेल्या बिबट्याचा धुडगूस, ६ जणांवर हल्ला; वनविभागाला दिला चकवा

Latest Marathi News Live Update : पवईत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Stock Market Closing: शेअर बाजारात तेजी कायम; निफ्टी 25,300च्या जवळ बंद, तेजी मागील कारण काय?

दिवाळीपूर्वीच Samsung ने दिलं मोठं गिफ्ट! आला पॉवरफूल 5G मोबाईल; 5000mAh बॅटरी..50MP कॅमेरा कॉम्बो, किंमत फक्त 12499

SCROLL FOR NEXT