पश्चिम महाराष्ट्र

कुरघोड्या, गमतीजमती सोडा, अन्यथा पक्षाला फटका

सकाळवृत्तसेवा

तासगाव - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षांतर्गत कुरघोड्या, गमतीजमती सोडा, अन्यथा तासगाव तालुक्‍यात पक्षाला फटका बसेल, असा गंभीर इशारा कार्यकर्त्यांनी नेत्यांना दिला. 

तसेच तालुक्‍यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊनच नेत्यांनी उमेदवारी फायनल करावी, अशी मागणी करण्यात आली.

सावळज येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
या बैठकीला माजी जि. प. सदस्य किशोर उनउने यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला. तासगाव तालुक्‍यातील सर्व मतदारसंघांत व सावळज जि. प. गटातून पक्षनेत्यांनी उमेदवारी देताना सर्वांना विश्‍वासात घेऊन उमेदवारी द्यावी. कुरघोड्या आणि गमतीजमती पक्षाला परवडणाऱ्या नाहीत, असा गर्भित इशाराही बैठकीत देण्यात आला. या वेळी किशोर उनउने यांनी, आर. आर. आबांच्या अनुपस्थित प्रथमच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाताना आबांची उणीव कार्यकर्त्यांना आणि पक्षाला जाणवत असल्याची जाणीव करून दिली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सावळजमध्ये एकदिलाने लढलो तरच आपला विजय होऊ शकतो. कुरघोड्यांमुळे पक्षाची हानी होणार असून, सर्वांना मान्य होईल असे उमदेवार पक्षाने निवडणुकीत निश्‍चित करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

या वेळी माजी सरपंच नितीन तारळेकर, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ भडके, अमित कांबळे, सूतगिरणीचे संचालक शिदगोंड पाटील, गुरलिंग माळी, राजू सावंत, विनायक पाटील, संतोष कांचनकोटी, गजानन सावंत, बाळू पाटील, सूर्यकांत पाटील, महावीर धेंडे, हणमंत निकम, राजू निकम, अतिम देवकुळे, दीपक उनउने, सुनील मगदूम, संजय उनउने, शिवाजी जाधव, राजेंद्र कलाल, राजू फासे, सूर्यकांत पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT