The task force will take action if the rules are violated 
पश्चिम महाराष्ट्र

नियमांचे उल्लंघन केल्यास टास्क फोर्स करणार कारवाई

बलराज पवार

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न अतिउत्साही नागरिक करत आहेत. त्यांना चाप बसवण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी 10 माजी सैनिकांचे टास्क फोर्स स्थापन केले आहे. या टास्क फोर्सने आज शहरात संचलन केले. महापालिका क्षेत्रात फिरून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर हा फोर्स दंडात्मक कारवाई करणार आहे. 

महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. अशावेळी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करण्याची गरज असतानाही कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने कामगार अधिकारी अनिल चव्हाण यांनी 10 माजी सैनिकांची नेमणूक केली आहे. हे माजी सैनिक आजपासून महापालिका सेवेत दाखल झालेत. लष्करी गणेवशातील या टास्क फोर्सने आज शहरातील बाजारपेठेत संचलन करुन नागरिकांना सोशल डिटन्स पाळणे, मास्क वापरणे तसेच रस्त्यावर न थुंकणे याबाबत जागृती केली. 

टास्क फोर्सकडून सोशल डिस्टन्सचे पालन न करणारे, मास्क न वापरणारे, रस्त्यावर थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

15 जणांवर कारवाई 

टास्क फोर्सने आज बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 15 जणांवर कारवाई केली. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या 12 जणांवर तर विना मास्क तीन जणांवर कारवाई करीत प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.  
 

संपादन : प्रफुल्ल सुतार  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT