vishnu gawade.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जांभुळणीत विजेच्या धक्‍क्‍याने शिक्षकाचा जागीच मृत्यू...विद्युत पंप सुरू करताना घडला प्रकार 

सदाशिव पुकळे

झरे (जि. सांगली)- जांभुळणी (ता. आटपाडी) येथील विष्णू विलास गावडे (वय 47) यांचा विजेच्या धक्‍क्‍याने जागीच मृत्यू झाला. श्री. गावडे हे न्यू हायस्कूल घरनिकी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी विद्युत पंप सुरू करण्यासाठी दडसवस्ती येथे विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असतानाच ही दुर्घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, जांभुळणी येथील गावडे वस्ती येथे रहिवासी असणारे शिक्षक विष्णू गावडे यांनी बेरगळवाडी येथे जमीन खरेदी केली होती. त्यामध्ये द्राक्षाची बाग लावलेली होती. त्या बागेला पाणी सोडण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेल्यानंतर ते बराच वेळ परतलेच नाहीत. त्यामुळे विष्णू गावडे यांच्या भावाचा मुलगा त्यांना बघण्यासाठी गेला. तेव्हा श्री. गावडे यांचा एक हात विद्युत पेटीला चिकटलेला होता. तसेच ते जमिनीवर पडलेले दिसले. 

त्यानंतर त्याने आरडाओरड केली. आरडाओरड ऐकताच आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी हा प्रकार पाहताच गावातील इतरांनाही माहिती दिली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. त्यानंतर तत्काळ विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. पोलिस पाटील अनिता पाटील यांनी आटपाडी पोलिसाना माहिती दिली. त्यामुळे पोलिस घटनास्थळी आले. त्यानंतर पंचनामा केला. 

मृत गावडे हे शिक्षक असले तरी त्यांना शेतीची आवड होती. त्यांनी यापूर्वी अनेक वेळा शेती खंडाने केली होती. त्यानंतर त्यांनी दोन एकर शेती खरेदी केली होती. त्यामध्येच द्राक्षाची बाग लावली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुलगे आहेत. शवविच्छेदनानंतर दुपारी चारनंतर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस नाईक एस.एस. संपकाळ व पोलिस नाईक नारायण गारळे तपास करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT