Teacher Found In Private Lender List In Kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक ! शिक्षकच करतोय खासगी सावकारी

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - शिक्षकच खासगी सावकारी करीत आहेत. १० टक्‍क्‍यांहून अधिक व्याजदराने त्यांची सावकारी सुरू आहे. जर व्याजाचे पैसे दिले नाहीत, शिक्षक सावकारांचा ‘मान’ राखला नाही तर थेट दमदाटी केली जाते. शाळेत विद्यार्थ्यांना राष्ट्रभाषा शिकवणारे शिक्षक गावगुंडांना घेऊन रात्री कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करतात. याबाबतचे तक्रार अर्जही पोलिस ठाण्यापासून थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांपर्यत दाखल झाले आहेत. 

शिक्षक आणि त्याचे पगार अनेकवेळा चर्चेत असतात. तसेच राजकारण आणि त्यातील शिक्षकांचा सहभाग हा एक चर्चेचा विषय असतानाच आता थेट खासगी सावकारीपर्यंत शिक्षकाची मजल गेली आहे. शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थांतून कर्ज घेऊन खासगी सावकारी करत असल्याचेही सांगण्यात येते. 

तीन लाख रुपये देऊन नऊ लाखांचा ‘कागद’

शहरातील मध्यवस्तीतील एका शाळेतील शिक्षकाची खासगी सावकारीत सध्या चर्चेत आली आहे. या महाशयांनी एका महिलेला ही व्याजाने कर्ज दिले आहे. दहा लाखांहून अधिक किमतीची मोटार त्याच्याकडे आहे. सहा गुंठ्यांतील बंगला आहे. मुलांना रुबाबदार गाड्याही त्याने दिल्या आहेत. शहराच्या बाहेर असलेल्या रिंगरोडवरून संपूर्ण शहरात या शिक्षकांची नजर आहे. पैसे व्याजाने द्यायचे आहेत म्हणून  शिक्षक पती-पत्नीला कर्ज प्रकरणात जामीनदार म्हणून घेतले आहे. तीन लाख रुपये देऊन नऊ लाखांचा ‘कागद’ करून घेतला आहे. कर्जदार शिक्षिकने वेळोवेळी पैसे देऊन ही, तो न दिल्याचा आरोप करीत आहे. शिक्षक असलेला हा खासगी सावकार संबंधित कर्जदार कुटुंबाला दमदाटी करीत असल्याचा आरोप कर्जदाराने पोलिसांकडे दिलेल्या अर्जात केला आहे.

दिवाळीचा फराळ पहिल्यांदा सावकाराला

प्रत्येक कर्जदाराने घरी दिवाळीचा फराळ तयार केल्यावर पहिल्यांदा या शिक्षक असलेल्या सावकाराला द्यावा लागतो. विशेष म्हणजे हा फराळ हा सावकार स्वतः घेऊन जातो. ज्यांनी फराळ दिला नाही त्यांच्या ‘मागे’ लागतो. प्रत्येक कर्जदाराकडून त्याच्या घरी प्रत्येक दिवाळीला फराळ येतो. जो देणार नाही त्याची गय केली जात नाही असेही सांगण्यात येते.

गावगुंडासह घरी दाखल

मागितलेले पैसे दिले नाहीत तर हा शिक्षक सावकार रात्री नऊनंतर गावगुंडांसह थेट कर्जदाराच्या घरी जातो. सर्व कुटुंबीयांना मानसिक त्रास देतो. यामुळे संबंधित कर्जदाराने थेट पोलिस ठाण्याचे दार ठोठावले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांकडेही तक्रार केली आहे. आता तो न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित खासगी सावकारी करणाऱ्या शिक्षकाची मालमत्ता तपासल्यास अनेक मुद्दे पुढे येण्याची शक्‍यता आहे.

दोन शिक्षकांचाही समावेश

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ज्या १२ खासगी सावकारांवर छापे टाकण्यात आले, त्यात दोन शिक्षकांचाही समावेश होता. पण, त्यांच्याकडे आक्षेपार्ह असे काही सापडले नाही. 
- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT