पश्चिम महाराष्ट्र

व्हॉट्‌सऍप ग्रुप ऍडमिन आहात ? काळजी घ्या, अन्यथा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एक एप्रिलला "जमावबंदी उठली' किंवा "रस्त्यावर एकत्र या' यासारखे फसवे मेसेज व्हायरल करून "एप्रिल फुल' करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंनी दिला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले. एका संशयित युवकाला कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
 
एक एप्रिल हा "एप्रिल फुल' म्हणून साजरा केला जातो. या वेळी नागरिकांकडून एकमेकांना चुकीचे संदेश देऊन गंमत म्हणून फसवण्याचे प्रकार होतात. त्यातून दिवसभरात अनेक अफवांचे पेव फुटतात. सोशल मीडियाच्या काळात त्यामध्ये आणखी भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी "एप्रिल फुल'च्या दिवशी (बुधवारी) काळजी घेण्याचे आवाहन सातपुते यांनी केले आहे.

एक एप्रिलला "जमावबंदी उठली आहे, सर्वांनी रस्त्यावर एकत्र जामायचे आहे,' अशा प्रकारचे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर पसरवले जाऊ शकतात. नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजला बळी पडून रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशा प्रकारचे मेसेज पसरविणाऱ्यांवर सायबर विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही असे मसेज तयार करू नयेत, तसेच आले तर ते फॉरवर्ड करू नयेत. ग्रुप ऍडमिननीही आपल्या ग्रुपवर याबाबत काळजी घेण्याचा मेसेज सर्व सदस्यांना द्यावा. एक एप्रिलला "ओन्ली ऍडमिन कॅन सेंड मेसेज' असे सेटिंग व्हॉट्‌सऍप ग्रुपवर करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
 
दरम्यान, कोरोनासदृश लक्षणे असलेल्या दोन संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. आज एका 38 वर्षांच्या युवकाला कोरडा खोकला व श्‍वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. 

गावातील माणुसकी आटली : २२ तासानंतरही मृतदेह जागेवरच; अखेर ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT