Telangana CM K Chandrasekhar Rao
Telangana CM K Chandrasekhar Rao esakal
पश्चिम महाराष्ट्र

K Chandrasekhar Rao : पंढरपूरनंतर गुलाबी वादळ आज सांगलीत; कोणता नेता लागणार गळाला? संपूर्ण राज्याचं KCR दौऱ्याकडं लक्ष

विजय लोहार

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून जगासमोर आलं. तेव्हा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी वाटेगावात उपस्थित राहणं, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

नेर्ले : वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त (Anna Bhau Sathe Jayanti) तेलंगणाचे मुख्यमंत्री भारत राष्ट्र समितीचे (BRS) के. चंद्रशेखर राव आज (ता. १) वाटेगावात उपस्थित राहणार आहेत.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समितीतर्फे वाटेगावात जयंतीची जय्यत तयारी केली आहे. वाटेगाव-भाटवाडी मार्गावरील माळावर मोठा मंडप उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री राव (K. Chandrasekhar Rao) व त्यांची टीम वाटेगावात दाखल झाल्यानंतर सुरवातीला ते स्मारकासमोरील अण्णा भाऊ यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन करतील.

क्रांतिकारक वीर फकिरा यांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर अण्णा भाऊंनी लेखन केलेल्या जन्म घरात भेट देतील. नंतर अण्णा भाऊ यांच्या लहानपणापासून ते मुंबईला जाण्यापर्यंतच्या प्रवास सांगणारी शिल्पसृष्टी उभारली आहे. त्याची पाहणी करणार आहेत.

अण्णा भाऊ यांच्या स्नुषा सावित्रीबाई साठे, नातू सचिन साठे आणि कुटुंबीयांच्या वतीने त्यांचं औक्षण व स्वागत करण्यात येईल. त्यानंतर मुख्य सभेच्या ठिकाणी के. चंद्रशेखर राव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चंद्रशेखर राव पंढरपूरनंतर पहिल्यांदाच वाटेगाव येथे उपस्थित राहणार आहेत.

पंढरपूरमध्ये त्यांनी केलेल्या विधानावर संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नेत्यांनी आपली मते मांडली होती. या ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांनी १९२० पासून ते आतापर्यंतच्या कष्टकरी, शेतकरी, गोरगरिबांच्या जीवनावर भाष्य कथा-कादंबऱ्यांच्या माध्यमातून समाजासमोर आणले. त्यातून उपेक्षित समाज व त्याचे जगणे लेखणीत आणले.

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून जगासमोर आलं. तेव्हा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी वाटेगावात उपस्थित राहणं, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील एकही मुख्यमंत्री वाटेगावला उपस्थित राहिला नसल्याची खंत अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी व्यक्त केली होती. एकूणच, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, हीच प्रमुख मागणी या कार्यक्रमात असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT