Temperatures 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत तापमान गेली आठवडाभर चाळीसीपार ; येत्या चार दिवसात घट; रविवारपासून पाऊस 

सकाळवृत्तसेवा


सांगली :  उन्हाच्या पाऱ्याने अपवाद वगळता चाळीशी पार केलेली आहे. रविवारी ( ता. 24) 41 अंश तर आज 40 अंश सेलिशयस तामपान होते. घामाच्या धारांनी लोक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागात यापेक्षा एखाद्या अंशाने अधिक तापमान राहते. येत्या चार दिवसात लोकांना दिलासादायक परस्थिती राहणार असून तापमान 37 अंशापर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. रविवार ( ता. 31 मे) पासून तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. 

गेली आठवडाभर अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा लोकांना सहन करावा लागतो आहे. रविवारी दुपारी तर अंगातून घामाच्या लाटाच सुटल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर थंड पदार्थ वर्ज करा, असे आवाहन केले जात असले तरी थंड पाणी आणि गेल्या आठवड्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर लॉकडाउनमुळे कोल्ड्रीक, आईस्क्रीम पार्सलच नेण्यावर लोकांनी भर दिला आहे. ऐन दुपारच्या वेळी बेकरीमधून थंड ताकाचीही गेल्या आठवड्यापासून मागणी वाढली आहे. यापूर्वी 14 मे रोजी उन्हाळी पाऊस झालेला होता. यानंतर 28 मे रोजी तापमानात वाढ होवून 31 मे ते 3 जून काळात सांगली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. 

  • वार, तापमान ( कमाल, किमान, अंशात) 
  • रविवारी (ता. 24), 41 व 25 
  • सोमवार ( ता. 25), 40 व 24 
  • मंगळवार ( ता. 26), 39 व 23 
  • बुधवार (ता. 27), 38 व 22 
  • गुरुवार ( ता. 28), 37 व 23 
  • शुक्रवारी (ता. 29) 37 व 23 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT