corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी तालुक्‍यात कोरोनाचे दहा रूग्ण..बाहेरून 21 हजार नागरिक दाखल

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली) -आटपाडी तालुक्यात सहा दिवसात दहा कोरोणाचे रुग्ण आढळलेत. बाहेरून आलेल्या त्रास होत असलेल्या चार आणि तालुक्यात सापडलेल्या कोरोणाग्रस्तांच्या संपर्कातील आकरा असे पंधराजणाचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात या आठवड्यात तब्बल एकवीस हजार जण बाहेरून अधिकृतरित्या आले आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि बाहेरून येणाऱ्यांची प्रचंड मोठी संख्या यामुळे तालुक्यात अस्वस्थता पसरली आहे.

कोरोना संसर्ग रोगाने देशभर पाय पसरले आहेत. सांगली जिल्ह्यातही रोगाने प्रवेश केला आहे मात्र आटपाडी तालुका कोरोना पासून लांब होता. शासनाने शहरातील लोकांना त्यांच्या गावी जाण्यास परवानगी दिली. या काळात आटपाडी तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाहेरून लोक आली आहेत. रीतसर परवानगी काढून आलेल्या लोकांची संख्या एकवीस हजारावर आहे. तर अनधिकृत आलेल्या लोकांची संख्या वेगळीच आहे. त्या अगोदर ही अनेकजण छुप्या मार्गाने आले आहेत. बाहेरून येणाऱ्या मध्ये मुंबईमधून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना त्या त्या गावच्या दक्षता समितीने कोरोणटाईन केले आहे.

सहा दिवसात आटपाडी तालुक्यात दहा रुग्ण सापडलेत. ते सर्वजण बाहेरून आलेत. यामध्ये मुंबईवरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तालुक्यात रोज रुग्णांची भर पडू लागल्यामुळे लोकात भीती पसरली आहे. प्राथमिक लक्षणे आढळलेल्या चौघाचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सोनारसिद्ध नगर येथील दोन रुग्णांच्या आईचा अहवाल कन्फ्युज आहे. त्यांची पुन्हा तपासणीसाठी श्वाब घेतला आहे. जांभुळणी व बनपुरी येथील रुग्णाच्या संपर्कातील अकरा जणांना काल रात्री तपासणीसाठी मिरजेला पाठवले आहे. असे संपूर्ण पंधरा जणांच्या अहवालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. इतर पिंपरी बुद्रुक पिंपरी खुर्द येथील रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यात बाहेरून मोठ्या संख्येने आलेल्या लोकांकडेही लक्ष लागले आहे. बाहेरुन यातही मुंबईतून येणार्‍यांची संख्या मोठी असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. याचा परिणाम संपूर्ण तालुक्यावर झाला आहे.

प्रशासनाने कंटेनमेंट झोन वगळून व्यवहार सुरू करण्याचे आदेश दिले असून दुकाने सुरू झाली आहेत. पण त्याला फारसा प्रतिसाद नाही. एसटीकडेही पाठ फिरवली आहे. अनेक गावे चिंतेने ग्रासली आहेत. काही ठिकाणी लोकांनी परस्पर रस्ते बंद केले आहेत. महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर येणे टाळले जात आहे. सार्वजनिक कार्यक्रम, भेटी घेणे, जेवणावळी सर्व थंड आहे. माणसंच बाहेर गावच्या लोकांना टाळू लागली आहेत. लोकांच्या मनात अस्वस्थता आणि भिती निर्माण झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT