police man.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पोलिसांसाठी बनतायेत दहा हजार मास्क

बलराज पवार

सांगली- कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या जिल्ह्यात संचारबंदी सुरु आहे. यामुळे पोलिस खात्यावर कामाचा मोठा ताण आहे. त्यातच या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलिसांनाही मास्क लावून रस्त्यावर उतरावे लागत आहे. मात्र सध्या बाजारात असलेली मास्कची टंचाई लक्षात घेऊन श्रुती दांडेकर आणि निलीमा वझे यांनी पोलिसांसाठी दहा हजार मास्क बनवण्याचे उद्दीष्ट घेऊन काम सुरु केले आहे. 


जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. नागरिकांना रस्त्यावर थांबू नये, गर्दी करु नये यासाठी सतत आवाहन करण्यात येत आहे. ही जबाबदारी जिल्ह्याचे पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली गृहखाते सक्षमपणे पार पाडत आहे. स्वत: पोलिस अधीक्षक श्री. शर्मा तोंडाला मास्क लावून रस्त्यावर नागरिकांना आवाहन करताना दिसतात. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गृहखाते डोळ्यात तेल घालून सज्ज आहे. या गृहखात्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मास्कची गरज आहे. प्रत्येक पोलिस स्वत: तोंडाला मास्क लावून नागरिकांना मास्कशिवाय फिरु नये असे आवाहन करत आहे. बाजारातही मास्कचा तुटवडा आहे. त्यामुळे मास्क तयार करण्याचेच मोठे आव्हान आहे. 


नेहमीच आगळेवेगळे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या श्रुती दांडेकर यांनी स्वत: काही मास्क घरगुती तयार करुन परिचयातील ज्येष्ठ नागरिकांना दिले होते. त्यावेळी त्यांना पोलिसांना मास्कची गरज असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी निलीमा वझे यांना सोबत घेतले. श्रीमती वझे यांनीही आनंदाने तयारी दर्शवली. दोघींनी पोलिसांसाठी दहा हजार कॉटनचे मास्क तयार करुन देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सोशल मिडियावर महिलांना आवाहन केले. कुणी आर्थिक मदत द्यावी किंवा मास्क तयार करण्यात मदत करावी असे आवाहन केले. महिलांनीही त्याला प्रतिसाद दिला आहे. 


निलिमा वझे म्हणाल्या, श्रुती दांडेकरांनी ही मास्क बनवून देण्याची संकल्पना मांडली. एक सामाजिक उपक्रम असल्याने मी तयार झाले. आता अनेक महिला यासाठी पुढे येत आहेत. सध्या 25 महिला घरातूनच मास्क तयार करुन देत आहेत. त्यांना मास्क तयार करण्यासाठी कॉटनचे कापड, इलॅस्टीक, नाड्या असे साहित्य पुरवले आहे. ते विकत घेण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. 


एन 95 मास्कची गरज नाही 
श्रुती दांडेकर म्हणाल्या, कोरोनाची साथ पसरण्यापुर्वी मी अमेरिकेतून परतले होते. सरकारने साथ जाहीर केल्यावर नागरिकांनी बाजारातून मोठ्या प्रमाणात मास्क खरेदी केले. त्यात एन 95 मास्कही घेतले. मुळात हे मास्क डॉक्‍टरांसाठी उपयोगी आहेत. सामान्य नागरिकांनी कापडाचे मास्क लावले तरी चालतात. ते घरच्या घरी करता येतात. घरातीलच जुनी ओढणी, साडी यांच्या उपयोग करुन घरीच तयार करावेत. 


यू ट्यूबवर मास्क कसे तयार करायचे याचा व्हिडिओ तयार केला आहे. तोच महिलांना दिला आहे. त्याच्या सहकार्याने या महिला मास्क बनवत आहेत. दिवसाला सुमारे हजार मास्क तयार केले जात आहेत. पोलिसांसाठी आजवर साडे तीन हजार मास्कर तयार करुन दिले आहेत. 
श्रुती दांडेकर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT