Ten thousand people returned to Karjat, 3 to the separation room 
पश्चिम महाराष्ट्र

कर्जतमध्ये परतले दहा हजारजण, १६जण विलगीकरण कक्षात

नीलेश दिवटे

कर्जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यात आतापर्यंत बाहेरून 10 हजार 71 नागरिक आले आहेत. त्यांत परदेशातून आलेल्या 16 जणांचा समावेश असून, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

कोरोनाच्या भीतीने मोठ्या शहरांतून गावाकडे येणाऱ्या लोकांचे प्रमाण मोठे आहे. गावात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ग्रामसेवक, तलाठी ठेवत आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांनी घरातच बसून राहावे, स्वत:सह गावाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविकांचे पथक घरोघरी जाऊन, नव्याने आलेल्या लोकांची नोंद घेत आहेत. कोणाला प्रकृतिअस्वास्थ्य वाटत असल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होण्याचे आवाहन डॉ. संदीप पुंड यांनी केले आहे. 

कर्जत नगरपंचायतीसह तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने गल्लीबोळांत ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने औषधफवारणी केली आहे. तहसीलदार छगन वाघ, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पुंड तालुक्‍यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दैनंदिन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला जात आहे. 

तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवालांनी आपल्या कार्यक्षेत्रात थांबायचे आहे. गावात बाहेरून येणाऱ्या लोकांची माहिती घेऊन नोंद करायची आहे. नागरिकांनीही घराशेजारी किंवा अन्य ठिकाणी कोणी नवीन लोक आले असल्यास, त्यांची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार छगन वाघ यांनी केले आहे. 

रिकामटेकड्यांवर कारवाई

देशात संचारबंदी असताना, अजूनही काही रिकामटेकडे लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी घरातच बसून राहावे. "मॉर्निंग वॉक'साठी जाणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. 
- सुनील गायकवाड, पोलिस निरीक्षक, कर्जत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT