Tenth and twelfth repeater examination in Valva taluka from today 
पश्चिम महाराष्ट्र

वाळवा तालुक्‍यात दहावी, बारावीची रिपीटर परीक्षा आजपासून

दिलीप क्षीरसागर

कामेरी : दहावी व बारावीच्या रिपीटर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा उद्या (ता. 20) पासून सुरू होत आहे. वाळवा व शिराळा तालुक्‍यातील 750 विद्यार्थी प्रविष्ट झालेत, अशी माहिती वाळवा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर यांनी दिली. 

ते म्हणाले, ""कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेबाबत पूर्ण दक्षता घेण्यात आलीय. विद्यार्थ्यांची सुरक्षित अंतर प्रत्येक वर्गात एक आड एक विद्यार्थी असे फक्त बारा ते तेरा विद्यार्थी एका ब्लॉक मध्ये बसवण्यात येणार आहेत याच बरोबर सुपरवायझर व विद्यार्थी यांना मास्क वापरणे बंधन कारक करण्यात आहे. 

वाळवा तालुक्‍यातील इस्लामपूर येथील विद्यामंदिर हायस्कूल येथे दहावीचे तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर येथे बारावीचे केंद्र, तर शिराळा येथे कन्या शाळा येथे दहावीचे तर बारावीचे विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळा येथे केंद्र असून आष्टा येथे महात्मा गांधी विद्यालयात दहावीचे तर बारावीचे आर्टस कॉमर्स कॉलेज या ठिकाणी विद्यार्थी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. इस्लामपूर, आष्टा व शिराळा या या तीन ठिकाणच्या केंद्रावर रिपीटर 750 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होत आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रावर व परिसरात हवी ती दक्षता घेण्यात आले आहे. सर्व केंद्रावरील वर्गखोल्या व परिसर सॅनीटाझर करण्यात आला आहे. परीक्षा कालावधीत मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे याचबरोबर रोजच्या रोज स्वच्छता व वर्गखोल्या सॅनिटायझर करण्यात येणार आहेत. दहावीची परीक्षा 20 नोव्हेंबर ते पाच डिसेंबर तर बारावीची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर अखेर होणार आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन प्रदीप कुडाळकर यांनी केले आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT