Tenth-twelfth exam: 76 thousand examinees anxious; Again the increasing prevalence of corona 
पश्चिम महाराष्ट्र

दहावी-बारावी परीक्षा : 76 हजार परीक्षार्थी चिंताग्रस्त; पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे सावट

अजित झळके

सांगली ः दहावी आणि बारावीची परीक्षा निश्‍चित झाल्याने झपाटून अभ्यासाला लागलेल्या तब्बल 76 हजार विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे, लॉकडाऊनचे नवे नियम समोर येत आहेत. पूर्ण टाळेबंदीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी आणि पालक चिंताग्रस्त आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा निर्विघ्न आणि सुरक्षितपणे पार पडाव्यात, अशी साऱ्यांनी अपेक्षा आहे. 


बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून ते दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून होईल, असे जाहीर करण्यात आले आहे. शाळांच्या पातळीवर तशी तयारी सुरू आहे. या परीक्षा कशा घ्यायच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आराखडा बनवण्यात येत आहे. दहावीचे 40 हजार 844 तर बारावीचे 36 हजार 90 विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. त्यासाठी दहावीची 103 तर बारावीची 49 केंद्रे असणार आहेत. काही नवीन केंद्रांची मागणी करण्यात आली आहे. या केंद्र संख्येत कोणतीही वाढ होणार नाही.

त्यामुळे काही ठिकाणची केंद्रे बंद होतील आणि नवीन केंद्र सुरू केली जातील. एका वर्ग खोलीत 24 विद्यार्थी या प्रमाणात मांडणी असणार आहे. एका खोलीसाठी एक समवेक्षक, उपकेंद्र संचालक, केंद्र संचालक अशा नियुक्‍त्या निश्‍चित केल्या जाणार आहेत. या प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यातून काही कोरोना बाधित आढळले तर पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आधीच करण्यात येणार आहे, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 


ही सर्व तयारी जिल्हा पातळीवर झालेली आहे, मात्र कोरोनाची धास्ती पुन्हा वाढू लागली आहे. बाजारपेठा रात्री आठनंतर बंद करण्यात येत आहेत. पाच लोकांहून अधिक जणांना एकत्र यायला मज्जाव केला आहे. अशावेळी परीक्षांबाबत सरकार काय धोरण राबवणार, पुढील महिनाभरात परिस्थती नियंत्रणात आली नाही तर काय, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत. 

परीक्षा सुरळीत पार पडतील

प्रत्यक्ष परीक्षा घेण्यासाठी आमची तयारी सुरू आहेत. त्यातून नव्या सूचना काही आल्या तर त्यानुसार बदल केले जातील. विद्यार्थ्यांनी संभ्रमात न राहता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. पालकांनी सहयोग द्यावा. जेणेकरून या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा सुरळीत पार पडतील. 
- विष्णू कांबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी 

परीक्षेचे वेळापत्रक 

  •  दहावी ः लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 
  •  बारावी ः लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 
  •  70 ते 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे जादा वेळ 
  •  40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे जादा वेळ 


काही महत्त्वाच्या सूचना 

  •  लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतच होणार 
  •  काहीअंशी एकापेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालये एकत्र करून परीक्षा 
  •  आरोग्यविषयक कारणामुळे गैरहजर विद्यार्थ्यांची तत्काळ विभागीय मंडळाकडे नोंद 
  •  अशा विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जूनमध्ये 
  •  या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही 
  •  थर्मल स्क्रिंनिंगसाठी एक तास आधी केंद्रावर उपस्थिती आवश्‍यक 
  •  तापमान तपासल्यानंतर प्रत्यक्ष पेपरपूर्वी 30 मिनिटे वर्गात जावे लागणार 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Maharashtra Politics: सहा जि.प.वर राहणार नारीशक्तीची सत्ता; अकोला, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियाचा समावेश

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT