पश्चिम महाराष्ट्र

Video बिबट्या आला हाे....गावागावांत चिंता

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील 150 हून अधिक गावांत बिबट्याचा वावर आहे. पाणी आणि भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्याचा शहरी भागात संचार वाढला आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍यातील मलकापूर, आगाशिवनगर, कापील, गोळेश्वरसारख्या शहरी भागालगतच्या गावांसह 52 गावांत बिबट्याचा वावर आहे. पाटण तालुक्‍यातील दुर्गम डोंगराळ भागात दिसणाऱ्या बिबट्याने आता त्याचे वेस ओलांडून शंभरांवर गावात झेप घेतली आहे.

अवश्य वाचा -  बारामतीतही बिबट्याची दहशत

बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांत सुमारे शेकड्याने पाळीव प्राणी ठार झाले आहेत. जंगलात बिबट्याला उपलब्ध होणारे खाद्य मिळत नसल्यामुळे तो बिबट्या नागरी वस्तीकडे वळला आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील सुमारे आठ हजार हेक्‍टरवर बिबट्याचा वावर अलीकडे वाढला आहे. पुढच्या काळात मानव विरुद्ध बिबट्या संघर्ष होऊ शकतो. त्यावर पर्याय शोधण्यासाठी वनखात्याला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. कऱ्हाड तालुक्‍याचा विंग, पाठरवाडी, तांबवे, आणे, येणके भागात बिबट्या दिसतो, असे सांगितले जायचे. मात्र, अलीकडे 40 पेक्षाही जास्त गावांत बिबट्याचे दर्शन होत आहे. आगाशिव डोंगरात रोजचाच नव्हे तर बिबट्याच त्या गडाच्या डांगराई देवीच्या परिसरात वस्तीला आहे.

हेही वाचा -  सावधान! शहरात घुसला बिबट्या, युद्ध पातळीवर शोध सुरू

त्यामुळे तो रात्री खाली उतरून आगाशिवनगर, जखिणवाडी, नांदलापूर, काले, धोंडेवाडी, ओंडमार्गे तालुक्‍याच्या अन्य भागांत दिसत आहे. तालुक्‍याच्या वन विभागाच्या हद्दीत 13 हजार 153 हेक्‍टर क्षेत्र आहे. वन विभागाच्या बीटनिहाय बिबट्याचे क्षेत्र वाढत आहे. मलकापुरात 770 हेक्‍टर, नांदगावात 728, कोळेच्या बिटात एक हजार 40, कासारशिरंबेत 588, तांबवेत 900, म्हासोलीत 833, वराडेत एक हजार 300, म्होप्रेत 916, तर चोरेत 950 हेक्‍टरच्या क्षेत्रात बिबट्याचा वावर आहे, अशी नोंद वन विभागाकडे आहे. पाच वर्षांत बिबट्याने नागरी वस्तीत शिरून मारलेल्या जनावरांची संख्या 500 वर आहे. त्यातील सुमारे 250 जनावरांच्या बदल्यात वनखात्याने दहा लाख 50 हजारांची भरपाई दिली आहे.

जरुर वाचा -  Video : अखेर असा पकडला बिबट्या : पहा Photos

पाटण तालुक्‍यातील 100 पेक्षा जास्त गावांत बिबट्याचा वावर सहज दिसतो. दोन्ही तालुक्‍यांत किमान 100 च्या जवळपास बिबट्या असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. पारंपरिक मार्ग सोडूनही बिबट्या आता अनेकदा कऱ्हाड ते चिपळूण हमरस्त्यावरही वावरतो आहे. मरळी कारखाना ते मोरणा पठार, वाल्मीक ते जरेवाडीच्या पूर्व- पश्‍चिम भागात आणि वनकुसवडेच्या संपूर्ण पठारावर त्याचे वास्तव्य आहे. 

बिबट्याची शिकारही... 

वाहनाला धडकून, नागरी वस्तीत शिरल्याने लोकांकडून मारला जाणे, खायला काही न मिळाल्याने व शिकाऱ्यांच्या हातून असे पाच वर्षांत सुमारे 20 हून अधिक बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात कऱ्हाड, पाटणसह सातारा तालुक्‍यातील ठिकाणांचा समावेश आहे. अपघातात चार बिबटांना जीव गमवावा लागला आहे. भुकेमुळे तीनपेक्षा जास्त, तर नागरी वस्तीत शिरणाऱ्या तीन बिबट्यांना जीव गमवावा लागला आहे. शिकार झालेल्या बिबट्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. 



 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येक कॅमेऱ्यात दोन ते तीन बिबट्या दिसतात. तेवढीच बिबट्यांची संख्या जंगलाबाहेरही कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत आहे. वन्यजीव विभाग वर्षातून चार वेळा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव गणना करतो. त्यातून बिबट्याची संख्या कळते. या उलट स्थिती प्रादेशिक वन विभागाच्या जंगलात व मनुष्य वस्तीत आहे. 

रोहन भाटे, पर्यावरण अभ्यासक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT