Solapur-Textile-Industry 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरच्या 'चादरी'लाही बसतेय मंदीची झळ!

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : मंदीचा फटका बसण्याचे लोण आता सोलापूरच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. येथील प्रिसिजन, बालाजी अमाईन्स, पारले या कंपन्यांसह वस्त्रोद्योगही मंदीमुळे अडचणीत आला आहे. उत्पादनांना उठाव नसल्याने उद्योग तोट्यात आले आहेत. यामुळे उत्पादन बंदसह कामगार कपातीचे धोरण कंपन्यांना राबवावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. सरकार उपाययोजना करेल व मंदी ओसरेल, या आशेवर उद्योजक आहेत. 

देशांतर्गत मारुती, ह्युंदाई, टाटा मोटर्सचे मार्केट खूप कमी झाल्यामुळे या मंदीची झळ प्रिसिजन कॅमशाफ्ट्‌सच्या उत्पादनांना बसली आहे. 'देशांतर्गतची कमी झालेली मागणी परदेशातील निर्यातीमुळे भरून निघत असल्यामुळे सध्या तरी या कंपनीत कामगार कपातीचे धोरण नाही. मात्र, पुढे काय होईल? याची शाश्‍वती नाही. त्यामुळे कामगार कपातीबाबत आताच काही सांगता येत नाही,' असे कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांनी शुक्रवारी (ता.23) 'सकाळ'ला सांगितले. 

अमाईन्स या रासायनिक उत्पादनाच्या सोलापुरातील बालाजी अमाईन्स या कंपनीलाही मंदीचा फटका थोड्याफार प्रमाणात बसत आहे. मंदीमुळे विविध समस्यांना गेल्या चार महिन्यांपासून बालाजी अमाईन्सला सामोरे जावे लागत आहे, असे कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

देशातील नावाजलेल्या पारले बिस्कीटलाही मंदी व जीएसटीचा फटका बसून व विक्री कमी झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. कंपनीने देशभरातील आठ ते 10 हजार कर्मचारी कपातीचे संकेत दिले आहेत. सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी येथील 'पारले'च्या वर्कशॉपमध्ये 350 च्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने सरकारकडे जीएसटी कमी करण्याची मागणी केली असून, त्यावर तोडगा न निघाल्यास कर्मचारी कपातीचा कटू निर्णय घ्यावा लागण्याचे संकेत कंपनीच्या सूत्रांकडून मिळाले. 

देशपातळीवरील वस्त्रोद्योगातही मंदीची लाट पोचली असून त्याचा फटका सोलापूरच्या यंत्रमाग आणि गारमेंट उद्योगाला बसत आहे. येथील उत्पादनाची चाके थांबण्याची शक्‍यता उद्योजकांनी व्यक्त केली. सोलापुरात या उद्योगात सुमारे 80 हजारांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. त्यांच्यातील काहींवर यामुळे नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते. परिणामी इतर उद्योगांसह वस्त्रोद्योग व गारमेंट उत्पादनांवर परिणाम होऊन रोजगारालाही फटका बसत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. 

मार्केटमध्ये मंदी आहे, तर संबंधित उद्योगाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात उद्योगांना भेटी देऊन समस्या जाणून त्यांचे निरसन करायला हवे. जीएसटीचं स्लॅब वाढवायला पाहिजे. पेमेंट रोटेशन नाही, व्याजदर जास्त आहे. कच्च्या मालाचे दर कमी केले पाहिजे. उद्योगांसाठी संपूर्ण देशात विजेचे दर एकच असायला हवे. उद्योग व रोजगारवाढीसाठी शासनाने ठोस पावले उचलायला हवीत. 
- राजू राठी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

SCROLL FOR NEXT