पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची शक्यता धुसर  Gallery
पश्चिम महाराष्ट्र

मिरज : पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची शक्यता धुसर

कोल्हापूर-गोंदिया, राणी चन्नम्मा, अजमेर, गांधीधाम गाड्या फुल्लः; दिवाळीमुळे गर्दी

शंकर भोसले

मिरज : दिवाळीमुळे रेल्वे गाड्यांना गर्दी वाढू लागली आहे. धनबाद, गोंदिया, अजमेर, गांधीधाम, राणी चन्नमा, निजामुद्दीन गोवा या महत्वाच्या गाड्यांचे महिन्याभराचे बुकींग फुल्ल आहे. फेस्टीव्हल म्हणून धावत असलेल्या गाड्यांचे तत्काळ तिकीट देणे बंद करण्यात आले आहे. कोरोना संसर्गानंतर सध्या मिरज स्थानकातून नियमितपणे १५ हून अधिक एक्स्प्रेस धावत आहेत. तब्बल तीसहून अधिक मालगाड्यांची ये-जा सुरू आहे. मात्र पॅसेंजरसाठी रेल्वे प्रशासनाचा अजूनही रेड सिग्नल आहे. दोन वर्षे पॅसेंजरसह सोलापूर-कोल्हापूर, मिरज-सोलापूर एक्स्प्रेस सुरू होण्याची प्रतिक्षा आहे.

कर्नाटकसह इतर राज्यात जाणा-या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे. जिल्ह्यातील परप्रांतिय कामगार देखील घरी जाण्यासाठी आरक्षण खिडकीवर गर्दी करू लागलेत. उत्तर भारतात जाणा-या यशवंतपूर-अजमेर, यशवंतपूर-गांधीधांम, गोवा-निजामुद्दीन या गाड्या हाऊसफुल्ल आहे. कोयना-मुंबई, कोल्हापूर-मुंबई(महालक्ष्मी) एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल आहे. एक ऑक्टोंबरपासून कोविड विशेष गाड्यांचा दर्जा कमी करून भाडे वाढ कमी होण्याची प्रवाशांना प्रतिक्षा होती. मात्र अद्यापही कोविड स्पेशल गाड्यांचे तिकीट हे पूर्वीपेक्षा वाढीवच आहेत.

मिरजेतून धावणा-या गाड्या

यशवंतपूर अजमेर, कोल्हापूर-गोंदिया, कोल्हापूर-मुंबई (कोयना एक्स्प्रेस), कोल्हापूर-मुंबई (महालक्ष्मी एक्स्प्रेस), गोवा निजामुद्दीन, कोल्हापूर-धनबाद, कोल्हापूर-नागपूर, हुबळी-दादर, पुद्देचेरी-दादर, यशवंतपूर-जोधपूर, यशवंतपूर-गांधीधाम

सामान्य तिकीटांसाठी नवी खिडकी

दिवाळीमुळे मिरजेत आरक्षण केंद्रावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मिरज रेल्वे स्थानकातून पंधराहून अधिक रेल्वे प्रवासी गाड्या धावत आहेत. मात्र या गाड्यातून प्रवास करताना तिकीट आरक्षित असणे गरजेचे आहे. मिरज स्थानकात सामान्य प्रवासी आणि आरक्षित प्रवाशांच्या तिकीटासाठी एकच खिडकी उपलब्ध आहे. आरक्षण केंद्रात गर्दी होते. त्यामुळे सामान्य तिकीटांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी हवी आहे.

'रेल्वे प्रशासनाकडून सध्या टप्प्या टप्याने मागणी नुसार एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू केल्या जात आहेत. पुढील काही दिवसात कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन पॅसेंजर रेल्वे देखिल सुरू होतील. मात्र तुर्तास तरी पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी परवानगी मिळालेली नाही.'

-मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी पुणे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT