मंत्री के. एस. ईश्वरप्पा  sakal
पश्चिम महाराष्ट्र

"ग्रामपंचायत आरोग्य अमृत योजनेचा मुख्य उद्देश जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरविणे"

मंत्री ईश्वरप्पा यांनी राज्यातील सर्व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दोन दिवशीय कार्यशाळेला चालना दिली

विनायक जाधव

बेळगाव : ग्रामपंचायत आरोग्य अमृत योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरविणे आहे. या योजनेच्या यशस्वितेसाठी सर्व शासकीय खात्यानी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केले.

येथील सुवर्ण सौधमध्ये सोमवारी (ता. ३०) मंत्री ईश्वरप्पा यांनी राज्यातील सर्व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दोन दिवशीय कार्यशाळेला चालना दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत आरोग्य अमृत योजनेचा देखील शुभारंभ केला. यावेळी ते म्हणाले, कोविड नियंत्रणात आणण्यासाठी जगात भारत प्रथम क्रमांकावर आहे. राजाने देखील हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अजूनही त्यावर प्रयत्न सुरू असून ग्रामपंचायतींचे पात्र देखील प्रमुख ठरले आहे. प्रारंभी जनतेमध्ये कोविड लसीकरण संबंधी गोंधळ होता. पण आता हा गोंधळ दूर झाला असून लोक स्वतः होऊन पुढे येत आहेत.

रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील जनतेला काम मिळवून देण्यात कर्नाटक प्रथम क्रमांकावर आहे. पुढील दोन वर्षात प्रत्येक घराला नळजोडणी देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यातून २८ हजार तलावांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री ईश्वरप्पा यांनी रोजगार हमी योजनेसाठी १८००-४२५-२८२२ हेल्पलाईन क्रमांकचा शुभरंभ केला. यावेळी ग्रामपंचायत पातळीवर कचरा उचल करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचे देखील लोकार्पण केले. कार्यक्रमाला जिल्हा पालक सचिव एल. के. अतिक, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT