Government schools Sakal
पश्चिम महाराष्ट्र

तुटपुंजा अनुदानामुळे सरकारी शाळांची अडचण

वाढीव अनुदान देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - दरवर्षी सरकारकडून सरकारी प्राथमिक, माध्यमिक व पदवी पूर्व महाविद्यालयाना दुरुस्ती व इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी अनुदान मंजूर केले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दिले जाणारे अनुदान तुटपुंजे असल्याने वाढत्या महागाईत शाळांची डागडुजी व शैक्षणिक उपक्रम राबविण्यास अनुदान कमी पडत असल्याचे सरकारी शाळा व महाविद्यालयांची अडचण होत आहे.

केंद्र सरकारकडून देशभरातील सर्व सरकारी शाळांसाठी एकच प्रकारचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या अनुदानातून शाळेमध्ये आवश्यक असलेल्या गोष्टींची डागडुजी, दुरूस्ती करुन घेण्यासह विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी करण्यासाठी दरवर्षी शाळा अनुदान उपलब्ध करून दिले जाते. मात्र दरवर्षी दिले जाणारे अनुदान कमी असल्याने दुरुस्ती करून घेण्यासह शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यावर मर्यादा येत असल्याची माहिती शाळांमधून दिली जात आहे. तसेच वाढत्या महागाईचा विचार करून शाळांना दिले जाणारे अनुदान वाढवले पाहिजे. असे मत व्यक्त होत आहे.

ज्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या तीस पर्यंत आहे. त्या शाळांना दरवर्षी 10 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तर त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या जितकी असेल त्याप्रमाणे अनुदान उपलब्ध करून दिले जात असले तरी राज्यातील अनेक सरकारी शाळांच्या इमारती जुन्या काळातील आहेत. तसेच अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सातत्याने या शाळांच्या डागडुजीकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे उपलब्ध करून दिला जाणारा निधी कमी पडत असल्याने एकच प्रकारचा निधी न देता अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. अशी मागणी होत आहे. सरकारी प्राथमिक शाळा ते सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाना दरवर्षी पुढील प्रमाणे अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

विद्यार्थी संख्या - अनुदान

१ ते ३० - १० हजार

३१ ते १०० - २५ हजार

१०१ - २५० - ५० हजार

२५१ - १००० - ७५ हजार

१ हजार पेक्षा अधिक - एकर लाख

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या

सरकारी प्राथमिक - १३७३

सरकारी माध्यमिक - १३०

सरकार कडून फक्त सरकारी शाळा व पदवीपूर्व महाविद्यालयांना दरवर्षी दुरुस्ती व इतर कामांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. मात्र अनुदानित व विना अनुदानित शाळाना कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान मंजूर केले जात नाही. त्यामुळे अनुदानित शाळा देखील विविध प्रकारच्या कामांसाठी विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या डोनेशनवर अवलंबून राहावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT