Theft of electricity has been revealed in Ichalkaranji marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

अबब... इचलकरंजीत 'इतक्या' लाख युनिटची वीज चोरी...

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) - वीजमीटरमध्ये छेडछाड करून त्याची गती कमी करत ३ लाख ४३ हजार ५५८ युनिटची वीज चोरी केल्याची घटना इचलकरंजीतील संगमनगरमध्ये उघडकीस आली आहे. दोन वीजचोरांविरुद्ध जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वीजचोरीपोटी ४७ लाख २१ हजार, तर तडजोड आकारापोटी २१ लाख, असा एकूण ६८ लाख रुपयांचा दंड वीजचोरांना ठोठावला आहे. महावितरणच्या इचलकरंजी विभागातील शाखा यड्रावमधील सहायक अभियंता अभिजित बिरनाळे यांनी फिर्याद दिली.

दोन टेक्‍स्टाईलवर छापा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यड्राव शाखेंतर्गत तारदाळ येथे शिवराज काशिनाथ लोले यांची मे. शिवराज टेक्‍स्टाईल्स, तर जगन्नाथ काशिनाथ लोले यांचे आदिनाथ टेक्‍स्टाईल्स पावरलूम कनेक्‍शनची जोडणी आहे. शिवराज टेक्‍स्टाईल्सची ४ लाख १९ हजार, तर आदिनाथ टेक्‍स्टाईल्सची ५ लाख ४८ हजार रुपयांची थकबाकी होती. त्यामुळे जुलै २०१९ला त्यांचा वीजपुरवठा बंद केला होता. उपकार्यकारी अभियंता सुनील आकिवाटे व सहायक अभियंता अभिजित बिरनाळे वीज कर्मचाऱ्यांना घेऊन मीटर तपासणीसाठी तेथे गेले होते. तेथे वीजपुरवठा अनधिकृतपणे जोडून मीटरला मागून छिद्र पाडून मीटरची गती कमी केल्याचा संशय त्यांना आला. पंचांसमक्ष दोन्ही मीटरची चाचणी विभागात तपासणी केली. त्यात मीटरची गती ३५ व ५२ टक्‍क्‍यांनी संथ केल्याचे निदर्शनास आले.

६८ लाखांचा ठोठावला दंड

शिवराज टेक्‍स्टाईल्सला १८ लाख ६१ हजार १८३, तर आदिनाथ टेक्‍स्टाईल्सला २८ लाख ६० हजार ११६ रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विद्युत कायद्यातील कलम १५२ नुसार तडजोड आकार प्रत्येकी १० लाख ५० हजार रुपये इतका दंड भरावा लागणार आहे. वीजचोरांविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. 
गळतीच्या भागावर लक्ष

इचलकरंजी विभागात विजेची मागणी मोठी आहे. महावितरणला पॉवरलूमसह औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापराची सविस्तर माहिती ऑनलाईन मिळते. या माहितीच्या आधारे गळती असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करून वीजचोरी उघडकीस आणली आहे. चोरांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जात असल्याचे महावितरणच्या इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता सोमण्णा कोळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savitribai Phule Pune University: चांगल्या गुणांनंतरही विद्यार्थी ‘नापास’! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार; ‘बी.कॉम’च्या निकालात घोळ

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात आज राजर्षी शाहू जयंतीचा सोहळा; अनेक ठिकाणी रोषणाई, विविध उपक्रमांद्वारे होणार विचारांचा जागर

FIFA World Cup 2026 मध्ये सर्वात मोठा उलटफेर! इक्वाडोरकडून बलाढ्य जर्मनीचा गेम अन् राष्ट्राध्यक्षांनी थेट सुट्टीच केली जाहीर

Mardi Tragedy: दुर्लक्षामुळे वीज सुरक्षेच्या घोषणा कागदावरच; मार्डी दुर्घटनेतून घेणार का धडा?, निर्ढावलेल्या यंत्रणेवर चाप जरुरीचा

Tukaram Mundhe FDA Action : तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! राज्यात महिनाभरात 904 ठिकाणी छापे, तब्बल 34 कोटी 66 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT