पश्चिम महाराष्ट्र

Video : 'ते' तिघे पहाटे दीड वाजता मंदिरात आले अन्‌...

परशुराम कोकणे

सोलापूर : कर्णिकनगर परिसरातील पावन गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी (ता. 18) पहाटे दीडच्या सुमारास घडली होती. प्रकाश सिद्धाराज लोणी (वय 47, रा. कर्णिकनगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

तोंडाला बांधले होते रुमाल
बुधवारी पहाटे सव्वा एक ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. आकाश ऊर्फ बाळासाहेब छोट्या पांडुरंग सोनकांबळे (वय 20), राकेश मारुती बनसोडे (वय 21, दोघे रा. पंचशीलनगर, कुमठा नाका, सोलापूर), राहुल राजू भंडारी (वय 26, रा. जुना विडी घरकुल, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास आकाश आणि त्याच्या साथीदारांनी पावन गणपती मंदिरात प्रवेश केला. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. मंदिरात असलेली दानपेटी चोरट्यांनी फोडली. त्यानंतर दानपेटीतील नऊ हजार रुपये त्यांनी चोरून नेले. चोरट्यांची ही हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याच आधारावरून पोलिसांनी तपासाला सुरवात केली.

क्लिक करा : शून्य टक्के व्याज दराने कर्ज हवे आहे का?

झुडपात लपवून ठेवले पैसे 
बुधवारी दुपारी आकाश आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलिसांनी अक्कलकोट रस्त्यालगत जलसा हॉटेल परिसरातून तिघांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान तिघांनी चोरी केल्याचे कबूल केले. चोरी केलेले पैसे कोंडानगर परिसरातील झुडपात लपवून ठेवले होते. पोलिसांनी हे पैसे जप्त केले आहेत. हवालदार योगीराज गायकवाड तपास करीत आहेत. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पोलिसांनी तपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; आठव्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार?, चर्चा निर्णायक टप्प्यात

Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Sadabhau Khot: 'देशात जगणं स्वस्त, मरणं महाग झालंय': सदाभाऊ खोत, फुकट धान्य आणि अनुदान थांबवा

SCROLL FOR NEXT