aashta.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाचे संकट, तरीही त्यांचा संघर्ष सुरुच आहे, 11 जणांच्या पालनपोषणासाठी,

तानाजी टकले

आष्टा (सांगली)-नियतीनं कर्त्या पोराला नेलय, एक पोरगा लॉकडाऊमुळं साताऱ्यात अडकलाय. आजारी म्हातारा, सुन आणि पाच नातवंडांना सांभाळायची तिची कसरत सुरु आहे. कोरोनानं कामधंदा काढून घेतलाय. तरीही या चक्रव्युहात ही साठी पार केलेली वृध्दा अभिमन्युसारखी लढतेय. कोरोना आणि लॉकडाऊनच्या या लढाईत आता मात्र तिला मदतीच्या हातांची खरी गरज आहे. 11 जणांचं कुटुंब सांभाळणाऱ्या या आजीची कैफियत शासन दरबारी पोहचणार का हा प्रश्न आहे.


येथील बिरोबा मंदिर परिसरातील खुल्या जागेत त्यांची झोपडी आहे. आजी, सुना, नाती..अशा तीन पिढ्यांचा गोतावळा याच खोपीत नांदतोय. आजी - आजोबा, मुलगा सूना, त्यांची बछडी अस तब्बल अकरा जणांचं कुटुंब. त्यात दोन ते दहा वर्षाच्या आतील पाच मुलं, चोघे कमवणारे अन 11 जण खाणारे. पोटभर अन्नाची भ्रांतच. हंगामा नुसार पत्र्याचे डबे, भांडी-कुंडी, दुरुस्त करणे, बरण्या, चटई विकून त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरु आहे.


मूळचे हे बागडी कुटुंबीय कर्नाटक अथणीतील. साठ वर्षा पासून ते मिळंल तिकडं काम करीत कुटुंबाची गुजराण करतात. पाच सात वर्षे घराचे तोंडही पाहत नाहीत. पिढ्यांच्या वारसदारांचा जन्म, पालपोषण अन पुन्हा पारंपरिक व्यवसाय भटकंतीतच होतो. वर्षभरापासून हे कुटुंबीय आष्टा येथेच राहते. पंचक्रोशीतील गावामधून काम करित कुटुंबाची उपजीविका सांभाळतात. कोरोनाच संकट आलं, लॉकडावून झालं, विक्रीसाठी गेलेले मुलगा, सून साताऱ्यातच अडकले. कधी न्हवे इतके दिवस बसून राहावं लागलंय, रेशन कार्डच नाही मग कुठलं त्यांना मोफत राशन. कुठला मास्क, कुठलं सॅनिटायजर. कसलं रक्षक. होतं न्हवतं ते पाक संपलय. शहर, गावं बंद, त्यामुळे काम बंद. लेकरा-बाळांच्या पोटासाठीचा प्रश्न सतावतोय. तरीही कोरोनाच्या महामारीत त्यांचा लढा सुरुच आहे. त्यांच्या या लढाईला गरज आहे एक हात.. एक घास मदतीची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT