anil babar.JPG 
पश्चिम महाराष्ट्र

अनिलभाऊ, शिवसेनेत रमत नसेल तर भाजपात या

सकाळवृत्तसेवा

खरसुंडी-आत्तापर्यंत आपण खूप संघर्ष केला. तालुक्‍याच्या विकासासाठी एकत्र येऊ या. कार्यसम्राट आमदार अनिल बाबर यांनी भाजपमध्ये यावे. शिवसेनेत त्यांचे मन रमत असेल असे मला वाटत नाही, असे मत भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी बेरगळवाडी (ता. आटपाडी) येथे व्यक्त केले. 


आटपाडी पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ. भूमिका बेरगळ यांचा नागरी सत्कार घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख उपस्थित होते. 


घरनिकी - बेरगळवाडीच्या नागरिकांच्यावतीने सभापती सौ. बेरगळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. खरसुंडी जिल्हा परिषद गट व घरनिकी पंचायत समिती गणातील परंपरा असल्याने नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. बाबर, माजी सदस्य श्री. पाटील, भाजपचे श्री. पडळकर, माजी समाजकल्याण सभापती श्री. पडळकर हे विधानसभा निवडणूकीनंतर प्रथमच कार्यक्रमानिमित्त नागरी सत्कार कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. 


भाजपचे स्टार प्रचारक, युवा नेते श्री. पडळकर म्हणाले,""यापुढे आटपाडी तालुक्‍याच्या विकासासाठी एकत्र येऊ या. भाजप-शिवसेना युती होती तोपर्यंत एकत्र काम करीत होतो. शिवसेना आघाडी सरकारमध्ये सामील झाल्याने आत्ता अडचण झाली आहे.'' 
ते म्हणाले,""तालुक्‍यात आतापर्यंत आपण खूप संघर्ष केला. हा संघर्ष वैयक्तिक नाही. राजकीय विचारांचा होता. यापुढे आपण तालुक्‍याच्या विकासाचे राजकारण करूया.'' 


मतदार संघाविषयी श्री. पडळकर म्हणाले,""कार्यसम्राट अनिल बाबर यांनी भाजपमध्ये यावे. शिवसेना आघाडी सरकारमध्ये असल्याने त्यांचे शिवसेनेत मन रमत असेल असे मला वाटत नाही. भले खानापूर मतदार संघाची पोटनिवडणूक लागली तरी चालेल आम्ही आपल्यासोबत आहोत. निवडून आणण्याची खात्री आम्ही देतो. तालुक्‍यातील मातब्बर एकत्र असतील तर भाजपमधून देखील आपणास आमदार करू.'' 
पंचायत समिती सदस्य सौ.सारिका भिसे, सभापती सौ.भूमिका बेरगळ, सभापती शेंडगे, पंचायत समिती सदस्य तानाजी यमगर, डॉ. बेरगळ, शिवराम मासाळ यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, नागरिक उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT