patil 
पश्चिम महाराष्ट्र

...तर जयंतरावांची सुटी करून टाकली असती, वाचा कोण म्हणाले असे ! 

अजित झळके

सांगली ः गेल्या विधानसभा निवडणुकीत मी पक्षाच्या कामात फार अडकलो, त्यामुळे इस्लामपूर मतदार संघाकडे फार लक्ष देता आला नाही. थोडा वेळ मिळाला असता तर जयंत पाटील यांची त्याचवेळी सुटी करून टाकली असती, अशी टोलेबाजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. 

पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत व्यासपीठावर होते. श्री. पाटील म्हणाले, ""जयंत पाटील राज्याचे नेते समजतात, पण ते राज्याचे कुठले जिल्ह्याचे, तालुक्‍याचे नेते आहेत. गेल्या विधानसभेला आमच्यात तीन तुकडे पडले. जरा बिनसलं. त्यामुळे अडचण झाली. मला थोडा वेळ मिळाला असता तर इथे विषय संपवले असते. मी पक्षाच्या कामात अडकलो. त्यामुळे फार लक्ष देता आले नाही. नाहीतर त्याचवेळी सुटी करून टाकली असती. अजून वेळ आहे, आता विधानसभेला त्यांना मी सुटी देत नसतो.'' 


पुणे पदवीधरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांच्या वयावरूनही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, ""72 वर्षांच्या लाड यांना पाच जिल्ह्यांचा मतदार संघ पेलवणार आहे का? त्यांना तेवढं फिरणं शक्‍य आहे का? आमचा उमेदवार तरुण आहे, 47 वर्षांचा आहे. कामाचा माणूस आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले, देशाचे आणि राज्याचे मानाचे पुरस्कार जिंकले. अतिशय चांगले काम करून दाखवले. असा कामाचा माणूस आमदार झाला तर आपल्याला विकासाला गती देता येईल.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT