पश्चिम महाराष्ट्र

"या' शहरात होतेय कोट्यवधीची पाणीचोरी 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः शहर व हद्दवाढ भागातील मिळकती आणि नळजोड यांचे प्रमाण जवळपास व्यस्त आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी अनधिकृत नळजोडातून चोरी होते हे उघड आहे. असे नळजोड महापालिका उत्पन्नाच्या "मुळावर'असून, पाणीचोरी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. विभागीय कार्यालयाने नुकत्याच केलेल्या पाहणीत नळ नसताना आकारणी झाल्याची हजारो प्रकरणेही सापडली आहेत, त्यामुळे सावळा गोंधळ उघड झाला आहे. 

नळधारकांचा प्रतिसाद नाही 
अनधिकृत नळजोड असलेल्यांना 10 हजार रुपये दंड करण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र सर्वसाधारण सभेने नियमित पाणीपट्टी आकारून नळ नियमित करण्याचा ठराव झाला. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहरातील अनधिकृत नळजोडाचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. शहर व हद्दवाढ भागात असलेल्या सुमारे 35 ते 40 हजार अनधिकृत नळांच्या माध्यमातून रोज 20-22 दशलक्ष लिटर पाण्याची चोरी केली जाते. या पाण्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. ते शोधून बंद करणे महापालिकेस आजपर्यंत तरी शक्‍य झाले नाही. 

हद्दवाढीत अनधिकृत नळजोड 
अर्धा इंची आकाराच्या नळाला तासाभरात हजार लिटर पाणी येते. तीन दिवसांआडच्या नियोजनामुळे तीन ते चार तास पाणी सोडले जाते. त्यामुळे प्रतितास पाच दशलक्ष लिटर याप्रमाणे चार तासांत 20 दशलक्ष लिटर पाण्याची सहज चोरी होत आहे. अनधिकृत नळांबाबत प्रशासनात हवे तितके गांभीर्य नाही. शहराच्या गावठाण भागात सुमारे 96 हजार, तर हद्दवाढीत सव्वा लाख मिळकती आहेत. नळजोड मात्र 54 हजार आणि 37 हजारांपर्यंत आहेत. गावठाणात सार्वजनिक नळ आहेत, हद्दवाढीत नाहीत. त्यामुळे हद्दवाढीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोड असण्याची दाट शक्‍यता आहे. 

आकडे बोलतात... 
(शहर व हद्दवाढ मिळून) 
एकूण मिळकती ः 2,16,750 
एकूण नळजोड ः 91, 866 
नळजोड नसलेल्या मिळकती ः 1,24,884 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT