There is no drinking water at Ahmednagar bus stand 
पश्चिम महाराष्ट्र

प्यायलाच पाणी नाही; मग हात धुणार कसे ? नगरच्या स्टँडवरील प्रकार 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः "कोरोना' आजारापासून बचावासाठी प्रशासनाने ठरावीक वेळेनंतर हात स्वच्छ धुण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, एसटी महामंडळाच्या शहरातील तिन्ही बसस्थानकांत पिण्यासाठीच पाणी नाही, तर हात कसे धुणार, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. 

शहरातील माळीवाडा बसस्थानकात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाणीच उपलब्ध नाही. परिणामी, विकतच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. काहीशी अशीच परिस्थिती पुणे बसस्थानक व तारकपूर बसस्थानकातही आहे. सध्या जगभर "कोरोना विषाणू'चा फैलाव झाला आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सातत्याने खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यात ठरावीक वेळेनंतर हात स्वच्छ धुण्यास प्रशासनाने सूचित केलेले आहे. मात्र, बसस्थानकांमध्ये पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही, तर हात कसे धुणार, असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन माळीवाड्यासह तिन्ही बसस्थानकांत पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे. 

"कोरोना' विषाणूने धुमाकूळ घातलेला असल्याने प्रशासनाने सातत्याने हात धुण्याची सूचना केली आहे. मात्र, नगरमधील बसस्थानकात हात धुण्यास पाणीच उपलब्ध नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. 
- ऍड. लक्ष्मण पोकळे, जिल्हाध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन 

सर्व बसस्थानकांत प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना दिल्या आहेत. माळीवाडा बसस्थानकात विजेची तांत्रिक अडचण असून, ती लवकरच सोडविण्यात येईल. 
- विजय गिते, विभागनियंत्रक, एसटी महामंडळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT