There will be strict adherence to the rules for darshan in Miraj Dargah 
पश्चिम महाराष्ट्र

मिरज दर्ग्यात दर्शनासाठी नियमांचे काटेकोर पालन होणार

प्रमोद जेरे

मिरज : शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा मिरासाहेब दर्ग्यात सोमवारपासून सुरू होणाऱ्या दर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी दर्गा परिसराची साफसफाई करण्यात आली. दर्गा परिसरात सॅनिटायझर आणि आणि सूचना फलक लावण्यात येत आहेत. 

दर्शनासाठी भक्तांची गर्दी होऊ नये, या उद्देशाने रांगेची शिस्त आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचे दर्गा व्यवस्थापन समितीचे सदस्य जानीब मुश्रीफ आणि नजीर मुतवल्ली यांनी सांगितले. 

दरम्यान, दर्ग्यामध्ये दिवाळीनिमित्त भक्तांनी आज फराळाचा नैवेद्य दाखविला. मिरज शहरासह कर्नाटकातील अनेक हिंदू परिवारामध्ये दिवाळी फराळाचा नैवेद्य दर्ग्यास दाखविल्यानंतरच फराळाचे सेवन आणि आप्तेष्टांना वाटप केले जाते. दर्ग्याला हा नैवेद्य म्हणून फराळ घेऊन आलेल्या भक्तांचीही बऱ्यापैकी गर्दी झाली होती. अनेक भक्त दर्गा परिसरातील गरीब आणि गरजू व्यक्तीनाही फराळाचे वाटप करतात. यावर्षीही ही परंपरा भक्तांनी जोपासली.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Plane Crash : ओडीशामध्ये भीषण दुर्घटना! भुवनेश्वरहून राउरकेला जाणारे विमान कोसळले

DMart संक्रांती सेल! स्टील भांडी फक्त 29 रुपयांपासून; किराणासह वाण साहित्य खरेदीसाठी रांगा, सर्व डिस्काउंट ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला महिलांना ३,००० रुपये मिळणार? फक्त एकच अडचण; पण कोणती? जाणून घ्या...

Eknath Shinde: दोस्ती का महागठबंधन’चा महापौर असणार, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास

Latest Marathi News Live Update : आम्हाला मदत करण्यात सध्याच्या सरकारने मोठी भूमिका बजावली - गोविंदा आहुजा

SCROLL FOR NEXT