Thermal screening weapon in the fight against corona 
पश्चिम महाराष्ट्र

'कोरोना' विरुद्ध लढ्यात थर्मल स्क्रिनिंगचे 'हत्यार'!

राजेंद्र हजारे

निपाणी (बेळगाव) : बेळगाव जिल्ह्यामध्ये 'कोरोना' बाधितांची संख्या वाढत आहे. अशातच मुंबईहून हासनकडे कंटेनरमधून जाणाऱ्या मजुरांना निपाणी पोलिसांनी थांबवून महाराष्ट्रात परतवून लावले होते. यावेळी शहरातील ११ जण मजुरांच्या तांड्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे प्रशासन, नगरपालिका, पोलिस शहर आणि ग्रामीण भागात कडक उपाययोजना राबवत आहेत.

त्यापाठोपाठ आता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य खात्याला 'थर्मल स्क्रीनिंग'बाबत प्रशिक्षण उपलब्ध केले आहे. त्याद्वारे अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यातर्फे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. येथे आता कोरोना विरुद्धच्या लढाईत 'थर्मल स्क्रिनिंग'चे हत्यार वापरले जात आहे.

सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज
कोरोनाच्या संसर्गापासून निपाणी शहरास दूर ठेवण्यासाठी लॉक डाउन, आठवडी बाजारासह दुकान उघड्यावर बंदी घालून खरेदीसाठी ॲप,  पोलिस बंदोबस्त, इतर गावातील नागरिकांना शहरात बंदी केली आहे. त्यानंतर शहरातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग मशीन उपलब्ध करून दिले आहेत.

हेही वाचा-पालिका, पोलिसांकडून उपाय योजना

महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले आहे. घरोघरी जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्क्रिनिंग सुरु आहे. यावेळी नियमापेक्षा जादा ताप व इतर आजाराची लक्षणे दिसताच आशा कार्यकर्त्याकडून त्याची माहिती आरोग्य केंद्राला दिली जात आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीवर क्वारंटाईन अथवा उपचाराची सुविधा उपलब्ध केली जात आहे. सुदैवाने दीड महिन्यात शहरात कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

' इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आशा कार्यकर्त्यांना थर्मल स्क्रिनिंगची सोय उपलब्ध झाली आहे. त्यानुसार शहरातील प्रत्येक प्रभागात फिरून या कार्यकर्त्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत. त्यामुळे विषाणूच्या संसर्गाची साखळी रोखता येणे शक्य आहे.'
- महावीर बोरण्णावर, आयुक्त,  निपाणी नगरपालिका
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

Latest Marathi News Live Update : नाशिक-चांदवड पुलाचा भराव गेला वाहून, ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

PAK vs SA : फुसका बार..! Babar Azam दोन चेंडूंत झाला गार; पुनरागमनाची फक्त हवा, पाकिस्तानी चाहत्यांना आलं रडू Video

Yami Gautam and Emraan Hashmi: यामी गौतम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र, ‘हक’मधून समाजाविरुद्ध लढणाऱ्या आईची कथा

SCROLL FOR NEXT